शिरूर तालुका

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचपदी सविता करपे बिनविरोध

शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीत सरपंचपदी सविता करपे यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजू आळणे व ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले यांनी दिली आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सरपंच महेंद्र रणसिंग यांनी त्यांच्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे सरपंचपद रिक्त झाल्याने नुकतीच सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली.

यावेळी सरपंच पदासाठी सविता करपे यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात अर्ज न आल्याने सविता करपे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजू आळणे व ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले यांनी जाहीर केले. निवडीनंतर सरपंच सविता करपे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी शिरुर पंचायत समितीचे माजी सदस्य विजय रणसिंग, माजी सरपंच महेंद्र रणसिंग, उपसरपंच तनुजा विधाटे, माजी उपसरपंच तेजस यादव, कानिफनाथ गव्हाणे, दादासाहेब करपे, बाळासाहेब चौधरी, संतोष करपे, उद्योजक विजय करपे, डॉ.किशोर सातकर यांसह तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच सविता करपे यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली तर यावेळी बोलताना गावातील सर्वांना बरोबर घेऊन गावचा विकास करत गाव आदर्श बनवणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सविता करपे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

7 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

7 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

12 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

12 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

12 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

12 तास ago