मुख्य बातम्या

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याविषयी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पश्चिम पट्यातील काही गावात कुकडी, चासकमान आणि घोडनदीच्या पाण्यामुळे लाखो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आल्यामुळे अनेक शेतकरी उसाची लागवड करतात. परंतु यावर्षी भीमाशंकर सहकारी साखर कारखानाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून ऊस वावरात वाळत चालला आहे. कारखाना ऊस नेत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने खाजगी कारखान्याला घालावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.

शिरुरच्या तालुक्याच्या पश्चिम भागात चासकमान धरणाचे पाणी आल्यानंतर शेती ओलीताखाली आली आहे. शेतकरी ऊसाची लागवड करत असून, अनेकजण भीमाशंकर साखर कारखान्याकडे नोंदणी करतात. परंतु ऊस तोडणीला आल्यानंतर कारखाना चालू होऊनही तोडणीच्या ढिसाळ नियोजनामुळे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना ऊस तोड करत नाही. शेतकरी ऊसतोडीबाबत पाठपुरावा करण्याचा केवीलवाणा प्रयत्न करतात. परंतु शेतकऱ्यांचे फोन न उचलणे इतर कारणे सांगत ऊस तोड कधी होईल हे सांगितले जात नाही. त्यामुळे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या मनमानी कारभाराला अनेक शेतकरी वैतागले असुन त्यांना विनाकारण मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

काही दिवसांपुर्वी विधानसभा निवडणुक पार पडली. त्यावेळेस निवडणूका आल्या की शेतकऱ्यांच्या पाया पडणारे नंतर शेतकऱ्यांकडे डोकूनही पाहात नसल्याची परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. दुसरीकडे शिक्रापुर-मलठण रस्त्यांवरुन याच कारखान्याच्या उस वाहतुकीमुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर अपघात घडत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्याच कुटुंबाचे नुकसान होत आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला असुन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याविषयी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

फोन करा किंवा अर्ज करा…
सध्या कडक उन्हाळा सुरु झाला असल्यामुळे शेतकरी फोन करुन ऊस तोडण्याची विनंती करतात. शिवाय, ऊसतोड करण्याबाबत अर्जही करतात. परंतु शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची परिस्थिती शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडत आहे.

याबाबत कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी सांगितले की, ‘यावर्षी कारखाना थोडा उशिरा चालू झाला. सध्या ऊस तोडणीचा प्रोग्राम हा तारखेनुसारच चालू आहे. तसेच शिरुर तालुक्यातील घोडगंगा कारखाना बंद असल्यामुळे त्या कारखान्याच्या अतिरिक्त उसाचा भार हा भीमाशंकर कारखान्यावर पडला आहे. परंतु शेतकऱ्यांनी पराग साखर कारखान्याला ऊस दिला तरीही शेतकऱ्यांच नुकसान होणार नाही. तसेच भिमाशंकर आणि पराग या कारखान्याच्या दरात फक्त १०० रुपयांचाच फरक आहे.’

..म्हणून पराग साखर कारखाना ऊसाला कमीत कमी ३००० रु. भाव देणार

Live Video : आघाडी सरकार आल्यास कारखाना सुरू करणार : शरद पवार

Video: घोडगंगा साखर कारखाना अशोक पवार यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही: महेश ढमढेरे

खाजगी कारखाना काढण्याच पाप अशोक पवारांनी केलं: दादा पाटील फराटे

शिरूर तालुक्यातील ऊसतोड मुकादमची फसवणूक करणाऱ्या ठकास अटक…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

6 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

6 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

6 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

7 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

7 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

20 तास ago