शिरूर तालुका

देशात शेती हेच खरे व्यवसाय शिक्षण: कांतीलाल उमाप

शिक्रापूर : शालेय शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी गुणवत्ता, विद्यार्थी सुरक्षितता त्याचप्रमाणे रॅगिंग विरोधी कायदा सर्वांनी बारकाईने समजावून घ्या. शालेय वयात विद्यार्थ्यांना दोन चाकी वाहने वापरास मनाई करा. या वयात विद्यार्थ्यांच्या अंगी कष्ट रुजविणे, शारीरिक क्षमतेचे संवर्धन करणे, विविध खेळांचे विद्यालयात आयोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 142 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात शेती हेच खरे व्यवसाय शिक्षण आहे. याबाबत अधिकची जागरूकता करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी आयुक्त व श्री. गुरुदत्त प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल उमाप यांनी केले.

जातेगांव बु ॥ (ता शिरूर) येथील श्री. संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जिल्हा परिषद पुणे – माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने गुरुवारी (ता. ७) आयोजित शिरूर, दौंड व खेड तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या कार्यशाळा मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, संस्था संचालक सुरेश मोरे, महादेव क्षिरसागर, साहेबराव उमाप, दगडू साळुंखे, विकास प्रतिष्ठान संस्थेचे सीईओ डॉ. धनंजय परकाळे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव नंदकुमार सागर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, सहसचिव मारुती कदम ,एमकेसीएल पुणेचे समन्वयक विनायक कदम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अभिनव सिंग, राज्य टीडीएफ संघटनेचे अध्यक्ष गोरक्षनाथ थोरात, राज्य आश्रमशाळा मुख्याध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष तुकाराम शिरसाट, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव बाळासाहेब चव्हाण, कार्याध्यक्ष नामदेव चौधरी, माजी अध्यक्ष तुकाराम बेनके, दौंड तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव उत्तम जावळे, माजी अध्यक्ष रामचंद्र नातू, खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव रामदास पवार, शिरूर हवेली शिक्षक संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, राष्ट्रपती पारितोषिक विजेते मुख्याध्यापक कुंडलीक मेमाणे आदि पदाधिकारी व मुख्याध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.

शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर म्हणाले, “शिरूर तालुका हा गुणवंतांची व प्रशासकीय अधिकाऱ्यांची खाण आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधे विद्यार्थी सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. जिल्हयात गुणवत्ता संवर्धन चळवळ, आस्थापना विषयक शिक्षक सेवा पुस्तके पूर्तता, अभिलेखे वर्गीकरण व जतन, ५ वी, ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी आधिकाधिक नोंदणी वाढविणे, ग्रंथालय समृद्धता, एक पेड माँ के नाम, हर घर तिरंगा उपक्रम, इन्स्पायर अवार्ड योजना, आनंददायी शनिवार इत्यादी बाबींची शाळाप्रमुखांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.”

प्रास्ताविक प्राचार्य रामदास थिटे यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश बांगर यांनी केले. आभार राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर यांनी मानले.

चौफेर वाचनाने व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास : प्राचार्य थिटे

प्राचार्य रामदास थिटे यांचा गुणवंत प्राचार्य पुरस्काराने सन्मान…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…

1 तास ago

अहिल्यानगर हादरले! चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या; एफडीएच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर…

2 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

6 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

6 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

6 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

6 तास ago