शिरूर तालुका

शिरूर! कोरेगाव भीमा येथे खाजगी बसला भीषण आग…

कोरेगाव भीमा (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथील डिंग्रजवाडी फाट्याजवळ आज (गुरुवार) आठवडे बाजाराच्या दिवशी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एका खाजगी कंपनीच्या बसने अचानक पेट घेतला. यामुळे महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

कोरेगाव भीमा येथे आठवडे बाजार होता आणि रस्त्यावर मोठी गर्दी होती. बसला आग लागताच प्रवाशांनी लगेच खाली उतरून जीव वाचवला. काहींनी धावपळ करून बसमधील सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. वाहन क्रमांक एम एच १२ व्ही एफ ६५२६ गाडी मालक कैलास ताठे यांची गाडी असून वाहन चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली तेच वाहन रस्त्याच्या एका बाजूला लावल्याने वाहतूक कोंडी टळली.

खाजगी कंपनीच्या बसणे अचानक पेट घेतल्याने पुणे नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले पण ग्रामस्थ, पोलिस कर्मचारी व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कार्यतत्परता दाखवत आगीला नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

कोरेगाव भीमा येथे डिंग्रजवाडी फाट्यावर खाजगी कंपनीच्या बसणे अचानक पेट घेतल्याने रस्त्यावर आग व धुराचे लोळ दिसू लागले त्यात गुरुवार असल्याने कोरेगाव भीमा येथे आठवडे बाजारामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यात सायंकाळची वेळ कंपनी कामगार व इतर वाहन चालक परतीच्या प्रवासाला असल्याने वाहनाची मोठी गर्दी होती त्यात अचानक खाजगी कंपनीच्या बसणे पेट घेतल्याने सुरुवातीला गोंधळाचे वातावरण निर्माण झाले पण ग्रामस्थ व पोलिस प्रशासनाने तातडीने मदत करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले व आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

यावेळी मदतीसाठी अग्निशमन दलाचे इन्चार्ज शुभम चौधरी, वाहन चालक शुभम बढे, अग्निशमक विमोचक सूरज इंगवले,योगेश पाटील, कृष्णा नागरे,सिद्धार्थ जाधव, पोलिस पाटील मालन गव्हाणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल श्रावण गुपचे, नाईकवडे व इतर पोलिस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते साईनाथ गव्हाणे, किरण सव्वाशे, प्रवीण राऊत, गोरक्ष दौंडकर यांच्यासह इतर ग्रामस्थ व प्रवाशांनी मोलाची मदत केली.

रांजणगाव एमआयडीसी पोलीसांकडून सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रम

Video: कारेगाव गणातून पंचायत समिती लढवणार : पप्पू भोसले

शिरूर! हरवलेला चिमुकला विसावला आईच्या कुशीत पोलिसांचेही डोळे पाणावले…

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत तलाठ्याची आरेरावीची भाषा; आत्ता जाग आली का…

शिरूर मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गुन्हेगाराचा धर्म पाहू नका, गुन्हा पाहा! भाजपचे दुहेरी निकष; सचिन सावंत यांचा हल्लाबोल

‘मुस्लिम आरोपी टाइम बॉम्ब, तर इतर आरोपी फुलबाजा का?’; महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारला घेरले मुंबई: गुन्हेगारीला कोणताही…

12 तास ago

विधानपरिषदेतील सहा वर्षांच्या कामाचा लेखाजोखा आता पुस्तकबद्ध

राज्यपालांच्या हस्ते डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या चौथ्या खंडाचे प्रकाशन मुंबई: विधानपरिषदेत मांडलेले प्रश्न, शासनाची उत्तरे आणि…

17 तास ago

लोकप्रतिनिधींच्या कामाचा दस्तऐवज समाजासाठी दिशादर्शक ठरेल; एकनाथ शिंदे

मुंबई: विधानपरिषदेतील कामकाज, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात झालेला संघर्ष यांचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडणाऱ्या…

17 तास ago

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीसाठी स्वतंत्र यंत्रणा; कमी बजेटच्या चित्रपटांना मिळणार नवी संधी

इफ्फीतील परिसंवादात सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांची महत्त्वपूर्ण घोषणा; सात दिवसांत चित्रीकरण…

17 तास ago

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…

20 तास ago

दुधात मध घालून प्यायल्याने हाडे व सांधे मजबूत होऊन गाढ झोप लागते

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध घालून पिणे ही अनेकांच्या घरातील एक अतिशय जुनी सवय आहे.…

20 तास ago