रांजणगाव गणपती (तेजस फडके) सायबर अवेअरनेस २०२५ उपक्रमाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस विभागातर्फे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभुमीवर नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत जागरुक करणे आणि फसवणुकीपासुन बचाव करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या पत्रकार परिषदेस शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिक्षक प्रशांत ढोले तसेच रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे उपस्थित होते. दोन्ही अधिकाऱ्यांनी नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी नागरिकांना खालील बाबींबाबत जागरुक करण्यात आले
१) ऑनलाईन, OTP, KYC अपडेट, Investment व Dating App Fraud यासारख्या फसवणुकींपासून सावध राहावे.
२) कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक खात्याची माहिती, OTP, UPI PIN, Debit/Credit Card तपशील देऊ नयेत.
३) समाज माध्यमांवर प्राप्त संशयास्पद लिंक, QR कोड किंवा Apps डाउनलोड करण्यापूर्वी पडताळणी करावी.
४) सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ 1930 या हेल्पलाईनवर संपर्क करावा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी.
यावेळी पोलिस प्रशासनाच्यावतीने नागरिकांना सायबर गुन्ह्यांविषयी जागरुक राहण्याचे, तसेच आपल्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समाजाला सायबर सुरक्षेबाबत माहिती देऊन “सुरक्षित डिजिटल व्यवहार” करण्याचे आवाहन करण्यात आले.
रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक
रांजणगाव हद्दीत ANTF ची धडक कारवाई; २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त, तिघे जेरबंद
बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…
पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…
मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…
नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…
आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…