eye
शिक्रापूर: कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी (ता. २०) मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी होणार आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य अनिल शिंदे यांनी दिली.
कान्हूर मेसाई (ता. शिरुर( येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रोटरी क्लब ऑफ पुना डाऊनटाऊन व कम्युनिटी आयकेअर फाउंडेशन यांच्या वतीने विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी होणार आहे. सदर शिबिरासाठी रोटरीयन उल्हास भोसले, डॉ.शरद तेलाप, डॉ. तरुण कुमार यांच्यासह चौदा डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना गरजेनुसार मोफत चष्म्या देण्यात येणार आहे.
कोरोना काळात मोबाईलचा अतिरेक वापर झाल्याने अनेक शाळकरी मुलांना दृष्टीदोष निर्माण झाला असल्याने वेळीच उपाय म्हणून विद्यालयात होत असलेली नेत्र तपासणी विद्यार्थ्यांच्या हिताची असल्याचे विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष गंगाधर पुंडे यांनी सांगितले.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…