RANJANGAON
रांजणगाव गणपती: कारेगाव (ता. शिरुर) येथे पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन लोखंडी फावड्याने डोक्यात मारुन गंभीर दुखापत केल्या प्रकरणी रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन निलेश विलास गायकवाड (वय २२) रा. कारेगाव, कर्डेरोड, कांचन रेसिसडन्सी बिल्डींग याने याबाबत फिर्याद दिल्याने मनोहर रामकिसन गायकवाड (सध्या रा. कारेगाव ता.शिरुर जि.पुणे) मुळ रा. नाशिक याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (दि १८) रोजी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास फिर्यादी हा कारेगाव-बाभुळसर येथे राहणाऱ्या एका मित्राला भेटायला गेला होता. तिथं मनोहर गायकवाड आला त्याने यापुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन “ वाढदिवसाच्या दिवशी तुला माज आला होता काय…? तु मला हात लावतो काय…?” असे म्हणत लाकडी दांडा असलेल्या लोखंडी पात्याच्या फावड्याने फिर्यादीच्या डोक्यात जोरात मारुन गंभीर दुखापत केली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी पोलिस उपनिरीक्षक सुहास रोकडे पुढील तपास करत आहेत.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…