क्राईम

शिरूर तालुक्यात किरकोळ कारणातून रिक्षाचालकाला मारहाण…

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाटवस्ती येथे एका रिक्षा चालकाला किरकोळ कारणातून सात जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत शिक्रापूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाटवस्ती येथे एका रिक्षा चालकाला पिकअप चालकाने शिवीगाळ केली. दरम्यान रिक्षा चालकाने शिवीगाळ करण्याबाबत जाब विचारल्याने सात जणांनी रिक्षा चालकाला मारहाण केली. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे केदार खंडेराव शितोळे, केतन खंडेराव शितोळे, ईश्वर नरके, ऋषिकेश (पूर्ण नाव माहित नाही) यांसह तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील रिक्षा चालक अकबर बागवान हा त्याच्या ताब्यातील एम एच १२ आर पी १०४२ हि रिक्षा घेऊन जातेगाव खुर्द येथे जात होता. पाट वस्ती येथे ऋषिकेश याने त्याला शिवीगाळ केली. काही वेळाने अकबर जातेगाव येथून आला त्यावेळी त्याने ऋषिकेश तला शिवीगाळ करण्याबाबतचा जाब विचारला त्याचवेळी ऋषिकेश सह काही युवकांनी त्याला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी अकबर याने आरडाओरडा केल्याने त्याची पत्नी भांडणे सोडवण्यास आली असता मारहाण करणाऱ्या युवकांनी अकबरच्या पत्नीला देखील मारहाण केली.

याबाबत अकबर उस्मान बागवान (वय ४२ रा. बांदल कॉम्प्लेक्स पाटवस्ती शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी केदार खंडेराव शितोळे, केतन खंडेराव शितोळे, ईश्वर नरके, ऋषिकेश ( पूर्ण नाव माहित नाही ) यांसह तीन अनोळखी व्यक्ती सर्व रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संतोष मारकड हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

12 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

12 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

12 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

12 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

13 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

13 तास ago