शिरूर: वाघाळे (ता. शिरूर) येथील ग्रामविकास अधिकारी दादासाहेब तुकाराम नाथ यांच्या पोल्ट्री फार्मवर गुरुवारी (ता. ११) पहाटे सुमारास बिबट्याने अचानक प्रवेश करून एका पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
View this post on Instagram
पोल्ट्री परिसरात गुरुवारी पहाटे अंदाजे तीनच्या सुमारास दोन कुत्र्यांनी जोर-जोरात भुंकणे सुरू केले. कडाक्याची थंडी असल्यामुळे फार्मवरील कामगार झोपेतून उठला नाही. याच संधीचा फायदा घेत बिबट्याने एका कुत्र्यावर झडप घालत त्याला ओढून नेले. काही वेळानंतर कामगार बाहेर आल्यानंतर त्याला केवळ एकच कुत्रा अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत भुंकताना दिसला. कामगाराने तात्काळ श्री. नाथ यांना माहिती दिली. त्यांनी पोल्ट्रीवर येऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बिबट्याने एक कुत्रा उचलून नेल्याचे स्पष्ट दिसून आले.
दरम्यान, वाघाळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात काम करण्यासही गावकऱ्यांना धाडस होत नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. वाघाळे गावातील सूर्यकांत बढे, सुनील गावडे, गणेश गावडे, रमेश बढे यांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी करून सुरक्षिततेची उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
करडे गावात मध्यरात्री घायतडक वस्तीवर घरात घुसून बिबट्याचा श्वानावर हल्ला…
शिरूर तालुक्यात बिबट्या केला जेरबंद; स्थानिकांना दिलासा…
Video: रांजणगाव MIDC परिसरात शिरला बिबट्या…
शिरुर तालुक्यात दोन जर्सी कालवडीवर बिबट्याचा हल्ला एक ठार, दुसरी गंभीर जखमी…
Video; शिरुर; वनमंत्री तालुक्यात असतानाच बिबट्याचा दिवसाढवळ्या १० शेळ्यांवर हल्ला