शिरूर तालुका

Video! पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव गणपती मंदिरासमोर बस जळून खाक…

शिरूर (संतोष धायबर) : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपती मंदिरासमोर शुक्रवारी (ता. १३) रात्री साडे आठच्या सुमारास धावत्या खासगी प्रवासी बसला अचानक आग लागला आणि बस जळून खाक झाली. संजय ट्रॅव्हलची बस पुण्याहून नागपूरकडे जात असताना बसला आग लागली. मात्र बसमधील प्रवाशांनी आणि चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण, बस जळून खाक झाली आहे.

संजय ट्रॅव्हलची बस पुणे येथून नागपूरकडे निघाली होती. रांजणगाव गणपती मंदिरासमोर बसमधून अचानक धूर निघत असल्याचे चालक आणि प्रवाशांच्या लक्षात आले. संभाव्य धोका ओळखत चालकाने तात्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. दरम्यान, काही क्षणांतच बसने पेट घेतला आणि आग वेगाने पसरली आणि परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

बसला लागलेल्या आगीमध्ये बसमधील काही प्रवाशांच्या बॅगा जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने प्रवासी वेळेत खाली उतरल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान,बसला आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. तांत्रिक बिघाड, शॉर्टसर्किट किंवा अन्य कारणामुळे ही घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पुणे-अहिल्यानगर महामार्गावर रात्रीची वेळ असल्यामुळे वाहनांची गर्दी असल्यामुळे अग्निशामक दल आणि पोलिसांना पोहचण्यास उशिर झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत आगीवर नियंत्रण मिळवले. बसला लागलेली मोठी आग आणि स्फोटाच्या आवाजामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. शिवाय, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ-मोठ्या रांगा लागल्या होत्या. परंतु, रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

तरुणाईची हुल्लडबाजी…
बसला आग लागल्यानंतर तरुणाईने रस्त्यावर येत मोबाईलमधून शुटिंग करत वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण केला होता. शिरूरकडून पुण्याच्या दिशेने वाहतूक कोंडी झाल्यामुळे अग्निशामक दल आणि पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यास उशिर झाला. आग्निशमक दलाची गाडी लवकर पोहचली असती तर आग लवकर आटोक्यात आणता आली असती. परंतु, हुल्लडबाजीमुळे अग्निशामक दलाची गाडी आणि पोलिसांना पोहचण्यास उशिर झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली तर रांजणगाव पोलिसांनी नागरिकांना बाजूला करत एका बाजूची वाहतूक सुरळीत केली.

Video: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीविरोधात शिक्रापूरकर उतरले रस्त्यावर…

शिरूर ! पुणे-नगर महामार्गावरील कासारी फाटा येथे कंटेनरने युवतीला चिरडले…

Video; पुणे-नगर रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले अन फॉर्च्यूनर घुसली थेट गाळ्यात…

पुणे-नगर महामार्गावर युवती किंवा महिलांना लिफ्ट देताय…? सावधान…

पुणे-नगर महामार्गावर शिरुर मध्ये एसटीच्या मालट्रकला आग अन्…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बहिणीच्या डोळ्यांसमोर भावाची पंचगंगेत उडी; रक्षाबंधनाची राखी हातातच

कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…

7 तास ago

‘कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय देणार’; शिंदेंचा निर्धार, परभणीत उबाठाला मोठा धक्का

परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…

7 तास ago

खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणा; अन्यथा रस्त्यावर उतरू!

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…

8 तास ago

शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…

24 तास ago

डीसीसी निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार? सुभाष देशमुखांचा ठराव; शहाजी पवारही मैदानात

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…

24 तास ago

भावाची प्रकृती पाहण्यासाठी गेले; भेट ठरली अखेरची! एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू

निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…

1 दिवस ago