shikrapur-traffic

Video: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीविरोधात शिक्रापूरकर उतरले रस्त्यावर…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिक्रापूर : पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर (ता. शिरुर) येथे होणारी वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असून, अनेकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक कोंडी व खड्ड्यांच्या समस्येबाबत स्थानिकांनी आक्रमक होऊन सोमवारी (ता. ६) जनआंदोलन केले. प्रशासनाने वाहतूककोंडी सोडवण्याबाबत लक्ष न घातल्यास व उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ट्रॅफिक मुक्त शिक्रापूर कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे. या जनआंदोलनामुळे प्रशासन हादरले असून, सर्व संबंधित खात्यांची एकत्रित बैठक येत्या शुक्रवारी (ता. १० ) शिक्रापूर ग्रामपंचायतीत घेण्याची घोषणा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले व पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

माजी आमदार सूर्यकांत पलांडे, सरपंच रमेश गडदे, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, माजी उपसरपंच मयूर करंजे, सुभाष खैरे, त्रिनयन कळमकर, ट्रॅफिक मुक्त शिक्रापूर कृती समितीचे अक्षय भुजबळ, सतीश सासवडे, अंकुश घारे, मंगल सासवडे, राजेंद्र मांढरे, कांतिलाल गवारे, नीलेश थोरात, गौरव करंजे, शिवाजी मांढरे, भाऊसाहेब केवटे, काकासाहेब चव्हाण, विजय लोखंडे, पंढरीनाथ गायकवाड, अमर करंजे, अशोक धुमाळ यांच्यासह शेकडोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास थेट महामार्गावर आंदोलन सुरू केले. यावेळी पोलिस खात्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बांधकाम खाते व पीएमआरडीएचे वाभाडे सर्व वक्त्यांनी काढले. माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांनी थेट रस्त्यावर ठिय्या मांडला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्याकडे देण्यात आले. तर पुढील कामात प्रशासनाने कडक पावले उचलून वाहतूक कोंडीसाठी उपाययोजना न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही सर्वांनी दिला. तर यावेळी अनेक स्थानिकांनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करीत काही युवकांनी मुंडण करत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला. शिक्रापूर येथे पुकारण्यात आलेल्या आंदोलनात वाहतूक कोंडीचा विषय असताना वाहतूक कोंडीला मुख्य कारण रस्त्यावरील कड्डे, चुकीचे अतिक्रमण हे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणीही फिरकले नसल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शिक्रापूर मधील वाहतूककोंडी बाबत आपण स्वतः पाहणी केली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. या आठवडाभरात आंदोलकांसह सर्वांची एक बैठक घेऊन वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत दिशा ठरवणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी सांगितले.

आंदोलकांच्या मागण्या नेमक्या कोणत्या?
– खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्त करावे
– पोलिसांनी विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक बंद करावी
– प्रशासनाने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात
– सर्व विभागांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक बोलावण्यात यावी.

शिक्रापूरमध्ये पोलीस निरीक्षकांची तत्परता; रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडीवर नियंत्रण

वाहतूक कोंडीत ॲम्ब्युलन्स अडकल्यान नवऱ्याच्या डोळ्यासमोर बायकोचा मृत्यू…

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करावे

रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) पर्यंत मेट्रो; वाहतूक कोंडी सुटणार…

पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीने प्रवाशी व नागरिक त्रस्त