शिरूर तालुका

धक्कादायक! शिरुर तालुक्यात मोबईच्या स्फोटात 10 वर्षांचा मुलगा जखमी

आमदार अशोक पवार यांनी तातडीने उपचार उपलब्ध करून देत सहाय्यक पी ए कुटुंबियांच्या मदतीसाठी पाठवले

शिरूर (तेजस फडके): पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील साहील नाना म्हस्के (वय १0) हा मोबाईलच्या स्फोटामुळे जखमी झाला असून त्याच्या डोळ्याला इजा झाली असून आमदार अशोक पवार यांनी प्रसंगावधान दाखवून साहिलच्या उपचारासाठी तातडीने एच व्ही देसाई हडपसर येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी मोलाची मदत उपलब्ध करून दिल्याने कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले आहेत.

पिंपळसुटी येथील साहील म्हस्के मोबाईल हाताळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला काही क्षण त्याला काही समजले नाही स्फोटाच्या आवाजाने कुटुंबीय धावत आले त्यावेळी सहीलाच्या डोळ्याला इजा झाली होती. तसेच तो खूप घाबरला होता. त्याच्यावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता होती.

कुटुंबीयांची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने त्यांनी याबाबत आमदार अशोक पवार व माजी सभापती सुजाता पवार यांना संपर्क साधला असता आमदार अशोक पवार यांनी मुलाची चौकशी करत काही काळजी करू नका, आपण त्याच्यावर उपचार करू घाबरु नका मी आहे, असे आधाराचे शब्द देत तातडीने सहाय्यक पि ए यांना कुटुंबियांच्या मदतीसाठी पाठवले तसेच वेळोवेळी उपचार व मुलाच्या तब्येतीची विचारणा करत कुटुंबीयांना आधार दिला.

पालकांनी मुलांच्या हातात तासनतास मोबाईल देण्यापेक्षा इतर बाबतीत त्यांना मनोरंजन, वाचन, लेखन, संवाद करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. मोबाईलच्या बॅटरी बाबत योग्य ती काळजी घ्यावी ज्यामुळे असे अपघात टळतील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

2 दिवस ago

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…

2 दिवस ago

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…

2 दिवस ago

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

3 दिवस ago

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन…

3 दिवस ago

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

4 दिवस ago