शिरूर तालुका

सविंदणे येथे महिला आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरूर (अरुणकुमार मोटे): “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानांतर्गत सविंदणे गावात महिलांसाठी व किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.या उपक्रमात महिलांची व किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी तसेच उंची व वजन मोजणी करण्यात आली. आरोग्य तपासणीसह महिलांना व तरुणींना आरोग्याविषयी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

याचबरोबर एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत “पोषण आहार सप्ताह” उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संतुलित आहाराचे महत्त्व, लहान मुलांचे व मातांचे पोषण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच शुभांगी पडवळ, विद्यमान सरपंच मनिषा ताई नरवडे, उपसरपंच मालुबाई मिंडे, सोसायटीच्या चेअरमन शोभा लंघे, सोनाबाई मोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका घुगे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कोमल राठोड, आरोग्य निरीक्षक बलभीम पठारे, आरोग्य सेवक विनायक गोसावी, आरोग्य सेविका तेजवंती नैताम तसेच सर्व अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

मान्यवरांनी “महिलांचे आरोग्य मजबूत राहिल्यास कुटुंब आणि समाज सशक्त होतो” असे सांगून अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. गावातील महिलांनी आरोग्य तपासणीसह आरोग्यदायी जीवनशैली अवलंबण्याचे ठरवून शिबिराचा लाभ घेतला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

20 तास ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

1 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

1 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

1 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

1 दिवस ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

2 दिवस ago