क्राईम

शिरूर शहरात अमोल ज्वेलर्सवर धाडसी दरोडा; मालकाने गॅलरीतून पाहिले अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील गजबजलेल्या सरदारपेठ परिसरात पहाटेच्या सुमारास अमोल ज्वेलर्स अँड सन्स प्रा. लि. या प्रतिष्ठित सराफ दुकानावर दरोडेखोरांच्या टोळीने धाडसी चोरी केली. चार ते पाच जणांच्या टोळीने अत्याधुनिक कटर व साधनांचा वापर करून दुकानाचे शटर, सुरक्षा ग्रील व काउंटरची काच फोडून तब्बल १ कोटी ३८ लाख ४० हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेला आले. यामुळे शहरात मोठी खळबळ मारली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मंगळवारी (ता. २४) पहाटे चार वाजेपासून साडेचार वाजेदरम्यान घडली. चोरट्यांनी सुरुवातीला परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे वाकडे केले, वायरी तोडल्या व काही कॅमेरे पूर्णपणे नष्ट केले. त्यानंतर दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करत त्यांनी ७० किलो चांदीचा ऐवज (पैंजन, तोडे, वाळे, चैन, हत्तीमोरा) किंमत ६.३० लाख, चांदीचे जोडवे ७ किलो किंमत ७ लाख, सोन्याचे कर्णफुले, अंगठ्या, चैन व अन्य दागिने ४६ ग्रॅम किंमत ४.१४ लाख,सोन्याचे गंठण, राणीहार, टेंपलहार, अंगठ्या आदी ७१४ ग्रॅम किंमत ६४.२६ लाख असा एकूण १ कोटी ३८ लाख ४० हजारांचा ऐवज लंपास केला आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांना चोरीची चाहूल लागताच दुकानदार वैभव पुरुषोत्तम जोशी यांना फोन करून माहिती देण्यात आली. स्वतः समोरच राहणाऱ्या जोशी यांनी गॅलरीतून ही घटना पाहिली व आरडाओरडा केला. त्यामुळे घाबरून चोरट्यांनी चारचाकी गाडीत बसून पळ काढला. ही संपूर्ण घटना दुकान व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदेश केंजळे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, पुणे ग्रामीण गुन्हे शाखा, रांजणगाव पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक लॅबचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिर्के यांनीही तपासात सहभाग घेतला.

या धाडसी दरोड्यामुळे शहरातील व्यापारी वर्ग व नागरिकांमध्ये ऐन नवरात्र, दसरा, दिवाळी या सणासुदीच्या पार्श्वभुमीवर प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Video; शिरुरमध्ये अमोल ज्वेलर्सवर दरोडा; लाखो रुपयांचा ऐवज लंपास

शिरुर तालुक्यात कंटेनर चोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिक्रापुर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा केला पर्दाफाश; सात दुचाकी जप्त

शिरुर तालुक्यात घरफोडी; ४८ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

20 तास ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

1 दिवस ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

1 दिवस ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

1 दिवस ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

1 दिवस ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

2 दिवस ago