शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्षक मुलांना घडवण्याचे मोलाचे कार्य करत असतात शिक्षकांमुळेच विद्यार्थी घडत असतात मात्र शासनाने शिक्षकांना मुलांना शिकवण्याशिवाय अन्य कामे देऊ नये, असे प्रतिपादन माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी केले आहे.
बकोरी ता. हवेली येथे शिक्षक दिनाच्या निमित्ताने माहिती सेवा समितीच्या वतीने शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे बोलत होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळू वारघडे, माजी राजेश वारघडे, ज्ञानेश्वर वारघडे, मुख्याध्यापक सुनील गायकवाड, कृष्णा गवळी यांसह आदी पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी बोलताना शाळेचा परीसर स्वच्छ व बोलका असून परिसरात झाडे, पाणी शुध्द पाणी, स्वच्छ किचन यांसह प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर असल्याचे शाळा पाहण्यासारखी असल्याचे मुख्याध्यापक सुनील गायकवाड यांनी सांगितले. शाळेच्या विकासासाठी व मुलांना खेळण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळू वारघडे यांनी केली दरम्यान सर्वं शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या निमित्ताने माहिती सेवा समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…