शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात ५३ वे बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन, १७ व १८ डिसेंबरला करडे येथे आयोजन

शिरूर (अरुणकुमार मोटे): विकसित आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती व सर्जनशीलता विकसित करण्याच्या उद्देशाने ५३वे शिरूर तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन येत्या १७ व १८ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री भैरवनाथ विद्यालय, करडे येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

या विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजनाबाबतची सहविचार सभा नुकतीच करडे येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत प्रदर्शनाच्या आयोजनाची रूपरेषा ठरविण्यात आली असून विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा व उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. शिरूर तालुक्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व मंडळांच्या शाळांनी या प्रदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या वर्षी प्रदर्शनाचा मुख्य विषय “विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM” असा असून शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन व प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडेलिंग, आरोग्य व स्वच्छता तसेच जलसंवर्धन व व्यवस्थापन या उपविषयांवर विज्ञान प्रकल्प सादर करता येणार आहेत.

प्रदर्शनामध्ये इयत्ता ६वी ते ८वी व इयत्ता ९वी ते १२वी असे दोन विद्यार्थी गट असतील. तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षक तसेच प्रयोगशाळा कर्मचारी यांचे शैक्षणिक साहित्य प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. निवड झालेल्या प्रकल्पांना जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

विज्ञान प्रकल्पांसोबतच विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा व प्रश्नमंजुषा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता ६वी ते ८वी व ९वी ते १२वी या गटांसाठी विविध विषय देण्यात आले असून प्रश्नमंजुषा स्पर्धा इयत्ता ८वी ते १०वी आणि ११वी ते १२वी अशा दोन गटांत होणार आहे. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनाची आवड निर्माण होऊन भविष्यातील संशोधक व वैज्ञानिक घडविण्यासाठी हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल, असे मत गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर व शिक्षण विस्तार अधिकारी किसन खोडदे यांनी व्यक्त केले.

या प्रदर्शनाची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य सत्यवान पवार व शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मारुती कदम यांनी दिली. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शिरूर पंचायत समितीचे अधिकारी, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ, गणित-विज्ञान अध्यापक संघ तसेच भैरवनाथ विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

9 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

9 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

9 तास ago

नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; घरामागे आढळला १८ वर्षीय हरिणीचा मृतदेह

तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू तेलंगणा:…

10 तास ago

पंतप्रधानांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; एआय संस्थेचीही पाहणी, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा

बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित…

10 तास ago

कलाकारांना मुंढेंचा इशारा; ‘लोकप्रियता म्हणजे कायद्यापासून संरक्षण नव्हे’

मुंबई : आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने…

10 तास ago