दुधाला भाव नाही…काढलेले कर्ज फिटणार कसे…? दूध उत्पादक युवक हताश

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) शिरुर तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसायाकडे वळाले. मध्यंतरी काही दिवसांपुर्वी दुधाच्या वाढलेल्या दरामुळे बेरोजगार तरुण वर्गही मोठया प्रमाणात दूध व्यवसायाकडे वळाला आहे. मागील सोळा-सतरा महिन्यांपासून गाय व म्हशीच्या दूध दरात वाढ झाली होती. प्रतिकूल परिस्थितीमध्ये दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत होता. मात्र पुन्हा दुधाचे दर घसरण्यास सुरुवात झाली असल्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या युवकांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या दूध दराची अंमलबजाणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

ऐन सणासुदीच्या तोंडावर एकीकडे दुधाच्या दरात घसरण झाली असुन दुसरीकडे मात्र पशुखाद्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. सगळीकडे दुधाला चांगली मागणी असतानाही दर कमी होत आहेत. मागील वर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला दुधाला प्रति लिटर ३९ रुपये दर मिळाला होता. त्यामुळे तरुणाई दुध व्यवसायाकडे वळली. बँकेचे, पतसंस्थेचे तसेच वेळप्रसंगी सावकाराचे कर्ज घेऊन, तरुण या व्यवसायात गुंतला आहे. परंतु दुध दर कपातीमुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. नव्याने दुध धंद्यात आलेला तरुण वर्ग कर्जाच्या विळख्यात अडकणार आहे. दुग्धजन्य पदार्थांना मागणी असूनही दूध दरात कपात केल्याने दुध व्यावसायिकांच्या पुढील संकट वाढले आहे.

 

दुधाला सध्या प्रत्यक्षात उत्पादन खर्चा एवढा सुद्धा दर मिळत नाही. दुधाचा लिटरमागे दहा रुपये दर वाढला असला तरी प्रतिलिटर उत्पादन खर्चाशी बरोबरी करत नसल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे. या काळात शेतकऱ्यांनी जगावे की मरावे अशी अवस्था झाली असुन दुधाला प्रतिलिटर ५५ रुपये उत्पादन खर्च असुन दुधाला प्रतिलिटर ३६ रुपये एवढा दर मिळत असुन दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुपटीने तोटा सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.

योगेश पुंडे, उपसरपंच कान्हूर मेसाई

 

या वर्षी मे आणि जून महिन्यात गायीच्या दूधाला ३८ रुपयांचा उच्चांकी दर मिळाला होता. त्यावेळी शासनाने अध्यादेश काढून गायीच्या दूधाला कमीत कमी ३४ रुपयांपेक्षा कमी दर द्यायचा नाही असे स्पष्ट केले. परंतु हा अध्यादेश काढल्यापासून दूध दरात टप्याटप्याने घट होत गेली. जुलै, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत पाच रुपयांनी गायीच्या दुधाचे दर कमी झाले. तर दिवाळीनंतर त्या दरात आणखी घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे गायीचे दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच प्रचंड मोठया प्रमाणात वाढलेले पशुखाद्याचे तसेच चाऱ्याचे दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी अजूनच अडचणीत आला आहे.

गिरीष शिंदे, दूध उत्पादक शेतकरी

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या, सरसकट कर्जमाफी करा!

छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा जनआक्रोश दुष्काळ मोर्चा; भाजपा महायुती सरकारवर नेत्यांचा जोरदार हल्लाबोल मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

9 तास ago

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

2 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

3 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

3 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

3 दिवस ago