शिरूर तालुका

ठराविक लोकांच्या फायद्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची वेळ बदलली जातीये

शिरुर (तेजस फडके): गेली अनेक वर्ष श्रीगोंदा, पारनेर तसेच शिरुर तालुक्यातील शेतकरी आपला शेतीमाल मोठया प्रमाणात शिरुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. गेल्या एक वर्षापुर्वी कोरोना काळानंतर वेळेत बदल करत शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सायंकाळी 6 ते 9 हि वेळ निश्चित केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनासोयीस्कर झाले होते. परंतु ऐन थंडीच्या दिवसात माल विक्रीसाठी पुन्हा पहाटे 2 ते सकाळी 7 पर्यंत वेळ बदलण्याचा घाट शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीने घातल्याने शेतकरी आक्रमक झाले असुन काही ठराविक व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठीच वेळ बदलण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

सध्या मोठया प्रमाणात थंडी सुटली आहे तसेच शिरुर तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात बिबटयाचे वास्तव्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. सध्या कोणत्याच मालाला बाजारभाव नसल्याने आधीच शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यातच शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतीमाल विक्रीची वेळ बदलन्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.

याबाबत शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सध्या सायंकाळी 6 वाजता बाजार समितीत मालविक्री केली जाते. परंतु जागा मिळविण्यासाठी शेतकरी लवकरच बाजार समितीत येतात. त्यामुळे तेथील व्यापाऱ्यांच्या ग्राहकांवर परिणाम होतो. तसेच बाजार समितीत कांदा मार्केट, सोयाबीन खरेदी चालु असते. त्याचही नियोजन आम्हाला करावं लागत. अनेक शेतकऱ्यांनी पहाटे मार्केट चालु करण्याचीही मागणी केली आहे. त्यावर आज दुपारी 12:30 वाजता शिरुर येथील मार्केट कमिटीच्या कार्यलयात शेतकऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांसाठी शेतकरी सेना मैदानात…

शिरुर बाजार समितीने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी करत ठाकरे गटाच्या शिवसेना शेतकरीसेना आता मैदानात उतरली असुन कृषी उत्पन्न बाजार समितीला काल शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यामध्ये शेतकर्‍यांना शेतमाल विक्रीसाठी सांयकाळी मार्केट खुले करण्यात यावे, शेतमाल गाड्यांना पार्किंग सुविधा,पिण्याचे पाणी,शेतमाल विक्रीसाठी जागा तसेच शेतकरी हा प्रथम मार्केट दुवा असल्याने त्याला सर्व सुविधा देण्यात याव्या या मागण्या करण्यात आल्या. त्यावेळी शेतकरीसेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ ,उपतालुकाप्रमुख अनिल पवार, जिल्हा समितीचे कैलास भोसले, तालुका सल्लागार संतोष काळे, शाखाप्रमुख आबासो काळे, बहुजन मुक्ती पार्टीचे नाथा पाचर्णे,फिरोज सय्यद तसेच असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

9 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

9 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

9 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

1 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

1 दिवस ago