क्राईम

पुणे नगर महामार्गावर इंडीव्हरकारच्या धडकेत एक ठार दोघे जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील येथील पुणे नगर महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या इंडीव्हर कारचची दुचाकीला जोरदार बसून एका युवकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाल्याची घटना असून सोहेल अल्लाउद्दिन अलवी याचा मृत्यू तर स्वप्नील संजय नागवडे व अभिजित विजय नागवडे हे दोघे जखमी झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अजित दत्तात्रय लांडे या कार चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन सोहेल अलवी हा त्याच्या ताब्यातील एम एच १२ टी एल ०२२८ या दुचाकीहून त्याचे दोन मित्र स्वप्नील नागवडे व अभिजित नागवडे या दोघांना घेऊन पुणे बाजूने अहमदनगर बाजूकडे जात असताना अचानकपणे पाठीमागून एम एच १२ टी डी ९७९८ हि इंडीव्हर कार भरधाव वेगाने आली आणि तिची दुचाकीला जोरदर धडक बसली.

यावेळी कारची अतिशय जोरात दुचाकीला धडक बसल्याने कारच्या सर्व एअर बॅग खुल्या झाल्या दरम्यान दुचाकीवरून तिघे जण रस्त्यावर पाडून गंभीर जखमी झाले तर कार सह दुचाकीचे खूप मोठे नुकसान देखील झाले. यावेळी झालेल्या अपघातात सोहेल अल्लाउद्दिन अलवी (वय २०) रा. पाटील प्लाझा सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. बाभूळसर बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे याचा मृत्यू तर स्वप्नील संजय नागवडे (वय २५) व अभिजित विजय नागवडे (वय २५) दोघे रा. पाटील प्लाझा सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बाभूळसर बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे हे गंभीर जखमी झाले.

याबाबत स्वप्नील संजय नागवडे (वय २५) रा. पाटील प्लाझा सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. बाभूळसर बुद्रुक (ता. शिरुर) जि. पुणे याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी इंडीव्हर कार चालक अजित दत्तात्रय लांडे रा. रांजणगाव गणपती (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

6 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago