Categories: इतर

पार्थ पवारांच्या राज्यसभेवरून भाजप-राष्ट्रवादीत वाद! देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट भाष्य

मुंबई: सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याच्या चर्चांना वेग आलेला असतानाच, भाजपाने पार्थ पवारांना विरोध केल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात होता. मात्र, या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत भाजपाने कोणालाही विरोध केलेला नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे.

पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीला भाजपाचा विरोध असल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “भाजपाने कोणालाही विरोध केलेला नाही. यासंदर्भात भाजपाशी कोणतीही चर्चा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. कोणाला उमेदवारी द्यायची, कोणाला पद द्यायचं हे निर्णय ते स्वतः घेतात.”

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत आमदार, खासदार, मंत्री, अध्यक्ष यासंदर्भात जे निर्णय घेतले, त्यात भाजपाने कधीही हस्तक्षेप केलेला नाही.दरम्यान, अजित पवार विलिनीकरणाबाबत चर्चा करत होते का, या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, “जर अजित पवार साहेब विलिनीकरणासाठी चर्चा करत असते, तर त्यांनी भाजपाला सांगितलं नसतं का? चर्चा करायची की नाही, विलिनीकरण करायचं की नाही, हा सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे. मात्र कोणताही निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा होईल, इतकी अपेक्षा आहे.”

राजकीय गोंधळावर टीका करताना फडणवीस म्हणाले, “रोज काहीतरी गोंधळ निर्माण करून कन्फ्युजन इको सिस्टीमद्वारे पसरवणं ही चुकीची पद्धत आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी उघड करू शकतो.”आपले आणि अजित पवार यांचे संबंध अत्यंत चांगले होते, असं सांगत फडणवीस म्हणाले, “मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. आदल्या दिवशी आम्ही जवळपास एक तास गप्पा मारत बसलो होतो.”

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर होणाऱ्या टीकेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, “हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. साथीदारांनी जो निर्णय घेतला, त्याच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे.”अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर उपस्थित केल्या जात असलेल्या संशयांवर फडणवीस म्हणाले, “DGCA ची चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स मिळालेला असून पायलट्समधील संभाषणासह सर्व माहिती त्यात उपलब्ध असते. त्यामुळे सत्य लवकरच समोर येईल.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

57 मिनिटे ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

8 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago