क्राईम

शिरूर तालुक्यातील भाजप नेत्याच्या फार्म हाऊसवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तृप्ती देसाई आक्रमक…

शिरूर: शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भाजप नेत्याच्या शेती आणि फार्म हाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजुराचा अल्पवयीन मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. विशाल गायकवाड असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

शिक्रापूर पोलिसांनी विशाल गायकवाड याला अटक केली आहे. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील भाजपच्या एका नेत्याच्या मालकीच्या शेती आणि फार्म हाऊसवर घडला आहे. दरम्यान, पीडितेला न्याय मिळवून देत असताना दबाव येणार असल्याचा गंभीर आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे.

पुण्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पुण्यातील एका भाजपा नेत्याच्या शेती आणि फार्म हाऊसवर विशाल गायकवाड आणि पीडित मुलगी यांचे आई-वडील वास्तव्य आणि कामासाठी आहेत. पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर विशालने या फार्म हाऊसच्या मागच्या मजूर खोल्यांच्या मागे या अल्पवयीन मुलीला नेले. तेथे गेल्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. याता याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

‘…तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल’

हा फार्महाऊस भाजपच्या नेत्याचा असल्यामुळे त्याची चर्चा कुठे होऊ नये, या फार्म हाऊसची चर्चा कुठे होऊ नये, यासाठी दबाव आणला जाऊ शकतो, अशी स्थानिकांनी शक्यता व्यक्त केली आहे, अशी माहिती तृप्ती देसाई यांनी दिली. अशा अनेक तक्रारी आणि फोन मला आले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे, की या 12 वर्षीय मुलीला न्याय मिळावा यासाठी हे प्रकरण तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवले जावे तसेच संबंधित भाजप नेत्याचा घटनेशी संबंध नसला तरी फार्म हाऊस त्यांच्या मालकीचे आहे. त्यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देसाई यांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

5 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago