Categories: इतर

शिक्रापूरात कारच्या धडकेत दुचाकीवरील बापलेक जखमी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठन फाटा येथून दुचाकीहून चाललेल्या बापलेकांना एका कारने धडक दिल्याने बापलेक जखमी झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बापलेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा येथून संभाजी तरपेवाड त्यांच्या ताब्यातील एमएच २६ ए एक्स ७१८२ या दुचाकीहून त्यांचा मुलगा दर्शन याला घेऊन चाललेले असताना पुणे बाजूने आलेल्या एम एच ३१ एफ आर ९५७० या कारची संभाजी यांना धडक बसून अपघात झाला. यावेळी दुचाकी वरील संभाजी तरपेवाड व दर्शन तरपेवाड हे दोघे बापलेक जखमी झाले मात्र कार चालक कार घेऊन पळून गेला.

याबाबत संभाजी नागूराव तरपेवाड (वय ४3) रा. मलठण फाटा शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी एम एच ३१ एफ आर ९५७० या वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र माने हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

14 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

15 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

15 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

15 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

15 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

15 तास ago