Categories: इतर

खा.चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पक्ष काँग्रेस सोबत फारकत घेणार

मुंबई: मुंबई महानगरपालिकेत काँग्रेस सोबत समाधानकारक चर्चा न झाल्याने खासदार अॅड चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पार्टीने काँग्रेस कडून फारकत घेण्याच्या तयारीत आहे.समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचे आदेश खासदार अॅड चंद्रशेखर आजाद यांनी महाराष्ट्रातील पदाधिका-यांना दिले आहेत.

त्यांच्या आदेशानंतर आजाद समाज पार्टीच्या पदाधिका-यांनी प्रदेश स्तरावर हर्षवर्धन सपकाळ यांची तर मुंबई अध्यक्ष प्रा. वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन आपला प्रस्ताव सादर केला होता.महाराष्ट्र स्तरावर स्थानिक पदाधिका-यांना चर्चेचे अधिकार देण्यात आल्याचे सपकाळ यांनी सांगितले होते.तसे निर्देश खाली देण्यात येतील असेही त्यांनी बैठकीत सांगितले होते.

मुंबई स्तरावर निवडक १४ जागांची मागणी आजाद समाज पार्टीने केली होती.त्यातील काही जागा देण्याची तयारी काँग्रेसने दाखविली होती.मात्र काँग्रेसची वंचित बहुजन आघाडीसोबत युती झाल्यानंतर काँग्रेसने आजाद समाज पार्टीला जागा सोडण्यास नकार दिल्यामुळे आता हा पक्ष स्वबळावर किंवा एम आय एम समाजवादी तसेच आंबेडकरी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीसाठी उमेदवार उतरवत असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.तसेच झाल्यास मुंबईत समविचारी पक्षांची मते फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

1 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

1 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

1 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

2 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

2 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

2 तास ago