कान्हूर मेसाई (सुनिल जिते): मलठण (ता. शिरूर) येथे चोरट्यांनी गणपती माळ येथील विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा लंपास केल्याची घटना शनिवारी (ता. २७) उघडकीस आली. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
परिसरातील शेतीसाठी कृषीपंप सुरू असणे आवश्यक असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने पिके आणि जनावरांचा चारा वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. चालू रब्बी हंगामात रोहित्र चोरी गेल्याने परिसरातील पिकांना जास्त प्रमाणात फटका बसणार आहे. त्यामुळे महावितरणने तातडीने नवीन रोहित्र बसवावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
‘महावितरण’ ची डोकेदुखी वाढली
बेट भागातील गावांमध्ये विद्युत रोहित्र चोरीच्या अनेक घटना घडल्या असून, आता पुन्हा चोरीच्या घटना सुरू झाल्याने शेतकऱ्यांची व महावितरणची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गस्त वाढवून ग्राम सुरक्षा दल व ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…