झारखंड: झारखंडमध्ये १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यात ही घटना घडली. १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर ३ दिवस बलात्कार करण्यात आला.एवढेच नाही तर आरोपीने पीडित मुलीचा व्हिडिओही बनवला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेमुळे झारखंडमध्ये खळबळ उडाली असून राजकारण चांगलेच तापले आहे.
पीडितेच्या वडिलांनी या प्रकरणी कोलेबिरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, १३ वर्षांची मुलगी १६ जुलै रोजी रात्री ९ वाजता अचानक गायब झाली. गावकऱ्यांसह त्यांनी सगळीकडे तिचा शोध घेतला पण ती काही सापडली नाही. ३ दिवसांनी १९ जुलै रोजी ती घरी परत आली. तेव्हा तिने तिच्या कुटुंबियांना तिच्यासोबत घडलेल्या भयंकर घटनेबद्दल सांगितले. आरोपीने तिला १६ जुलै रोजी फोन करून घराबाहेर पडण्यास सांगितले. जर तिने तसे केले नाही तर तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरून ती बाहेर आली.
घाबरून पीडित मुलगी घराबाहेर गेली आणि आरोपीने तिला जबरदस्तीने त्याच्या घरी नेले. आरोपीने तिला ३ दिवस आपल्या घरात डांबून ठेवलं आणि तिच्यावर ३ दिवस वारंवार बलात्कार केला. पीडितेने पुढे आरोप केला की, त्या मुलाने तिला तीन महिन्यांपूर्वी जबरदस्तीने एका बागेत नेले होते. आरोपीने तिथेही तिच्यावर बलात्कार केला होता. यादरम्यान आरोपीने तिचे अश्लिल व्हिडिओ बनवले होते. आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करण्यासाठी हे फोटो आणि व्हिडिओ वापरत होता. याच व्हिडीओद्वारे त्याने पीडितेचे अपरहण करून तिच्यावर ३ दिवस बलात्कार केला.
सिमडेगाचे एसपी मोहम्मद अर्शी यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडितेच्या कुटुंबाने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली. पीडिता आणि आरोपी दोघेही अल्पवयीन आहेत. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. रविवारी पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी झारखंडमधील वातावरण चांगलेच तापले आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…