मुंबई: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकांसदर्भात केलेल्या आरोपांमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांसह देशात इतरही ठिकाणी मतांची चोरी करण्यात आली, असा मोठा आरोप त्यांनी केला आहे.
हे आरोप करताना त्यांनी अनेक पुरावेही सादर केले आहेत. राहुल गांधींच्या या आरोपांनी आता निविडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील आज (11 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आणि निवडणुकीविषयी गंभीर दावे केले आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच कॉमेडियन कुणाल कामरा याने एक चार शब्दांचे ट्वीट करून देशात खळबळ उडवून दिली आहे.
कुणाल कामरा याने नेमकं काय म्हटलय
कुणाल कामरा यानेदेखील आपल्या ट्विटमध्ये निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय. गेल्या काही दिवसांपासून तो देशातील निवडणूक घेण्याची प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाची भूमिका यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय. याआधी त्याने 7 ऑगस्ट रोजी एक ट्विट् करून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची द सिलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणत खिल्ली उडवली होती. आता त्याने अवघ्या चार शब्दांचे ट्वीट करत पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. त्याने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय निवडणूक आयोगाला थेट इलेक्शन कॉम्प्रोमाईज ऑफ इंडिया असे म्हणत या स्वायत्त संस्थेची निर्भर्त्सना केली आहे.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…