क्राईम

निमोणे येथे ७२ वर्षीय व्यक्तीचा निर्घृनपणे खुन

शिरुर (अरुणकुमार मोटे): निमोणे (ता. शिरुर) येथील मोटेवाडीमध्ये आपल्या मुलीकडे काही दिवसांपुर्वी वास्तव्यास आलेले मनोहर चंदरराव शितोळे रा. सांगवी सांडस, ता. हवेली, जि. पुणे यांचा निमोणे- मोटेवाडी रोडलगत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या चेहऱ्यावर, कमरेवर, पाठीवर, गुप्तांगावर ठिकठिकाणी मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी करुन त्यांचा निर्घृनपणे खुन केला आहे. त्याबाबत त्यांचा मुलगा राजाराम मनोहर शितोळे रा. सांगवी सांडस, ता. हवेली, जि. पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये रितसर फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. २) फेब्रुवारी रोजी ८ वाजण्यापासून ते (दि. ४) फेब्रुवारी रोजी दुपारी १ वा वाजण्याच्या सुमारास मौजे निमोणे येथील निमोणे – मोटेवाडी रोडलगत नानासाहेब कुंडलिक काळे यांच्या शेतजमीन गट नं ६१९ मधील ऊसाच्या शेतामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन फिर्यादीचे वडील मनोहर चंदरराव शितोळे (वय ७१)रा.सांगली सांडस, ता. हवेली, जि. पुणे यांच्या चेहऱ्यावर, कमरेवर, पाठीवर, गुप्तांगावर ठिकठिकाणी मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी करुन त्यांचा खुन केला आहे. हा खुण कुणी व कशासाठी केला याचा शोध शिरुर पोलिस घेत असून या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप यादव हे करत आहे.

शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या महीन्यात उरळगाव येथे महिलेचे अर्धवट जळालेले प्रेत सापडले होते. त्या महीलेची अद्याप ओळख पटली नसून या खुणाच्या गुन्हयासह या 2 गुन्हयांची उकल होणे शिरुर पोलिसांपुढे आव्हाण बनले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago