क्राईम

आमदारांनी मैत्रिणीवर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

औरंगाबाद: नेहमी वेगवेगळ्या कारणांनी सदैव चर्चेत राहणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर त्यांची मैत्रीण ईशा झा यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी कन्नड शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे हर्षवर्धन जाधव यांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ ईशा यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

ईशा झा यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले की हर्षवर्धन जाधव यांनी मला बेदम मारहाण केली आहे. माझे केस पकडून जाधव यांनी मला मुक्का मार देत मारहाण केली आहे. त्यामुळे पोलिसात मी तक्रार दाखल केली असून, आता काय होईल याबाबत मला माहित नाही, असे ईशा झा यांनी म्हटले आहे.

तर पुढे बोलतांना त्या म्हणाल्या आहेत की, आता मी दमले आहे, माझ्यावर नेहमी संशय केला जातो, माझे नावं प्रत्येकाशी जोडले जातात. घरात असलेल्या एका मुलाशी माझे संबध जोडण्याच प्रयत्न केला. मला वाटले होते ते बदलून जातील, मात्र तसं झालं नाही. मला खूप मारहाण केली असून, मी कन्नड सोडून जात आहे. त्यामुळे यानंतर मी कधीच कन्नडमध्ये परतणार नसल्याचं देखील ईशा झा यांनी म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

3 तास ago

Video! नगर-पुणे महामार्गावर धावत्या कंटेनरच्या टायरला आग; टाकीजवळच भडका…

कारेगाव (तेजस फडके): नगर-पुणे महामार्गावर कारेगाव-रांजणगाव शिव हद्दीत LG कंपनी समोर आज (रविवार) सकाळी अकराच्या…

7 तास ago

शिरुर पोलिसांच्या DB पथकाने मोकोका गुन्ह्यातील फरार टोळीप्रमुख योगेश मचालेच्या आवळल्या मुसक्या

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोकोका) गुन्हा दाखल असलेल्या आणि गेल्या सात…

9 तास ago

‘सीएम-सृष्टी’ नव्हे, ही तर ‘सीएम-तुष्टी’! पेपरफुटीवर मौन, विद्यार्थ्यांवर दडपशाही; अमोल मातेले

‘लॅब गायब, बेरोजगार तरुण लाचार’; नव्या योजनेच्या नावाखाली सरकारकडून अपयशावर मलमपट्टी केल्याचा आरोप मुंबई :…

2 दिवस ago

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

3 दिवस ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

3 दिवस ago