क्राईम

गणेगाव दुमाला येथील म्हसोबावाडी शाळेच्या जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील म्हसोबावाडीच्या जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात अतिक्रमण करुन शाळेचे कामकाज विस्कळीत केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या मैदानाचे ट्रकरच्या साह्याने काकऱ्या मारुन नुकसान, बोअरवेलच्या मोटारीची वायर व पाईप तोडणे, तसेच विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्याचे प्रवेशद्वार बंद केल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणी म्हसोबावाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक भागवत हरीभाऊ शेंडकर (वय ४२, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने सदाशिव बाबूराव भोसले, ताराबाई सदाशिव भोसले, महेंद्र सदाशिव भोसले, सचिन सदाशिव भोसले (सर्व रा. म्हसोबावाडी, गणेगाव दुमाला, ता. शिरुर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन वेळा कामात अडथळा…

शिक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसार, दि ०४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे १०:३० च्या सुमारास जुन्या शाळा आवारातील तार कंपाउंडचे काम वरील आरोपींकडून बंद पाडण्यात आले होते. त्यानंतर २७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे १०:३० च्या सुमारास शाळेच्या जुन्या जागेतील मुलांच्या मैदानावर ट्रॅक्टरच्या साह्याने काकऱ्या मारुन मैदानाचे नुकसान करण्यात आले. तसेच बोअरवेलच्या मोटारीची वायर आणि पाईप तोडण्यात आल्याने शाळेतील पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची अडचण निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा…

सदर प्रकारामुळे शाळेचे प्रवेशद्वार बंद झाले अन अडथळा निर्माण झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्यावर परिणाम झाला आहे. मैदानाची तोडफोड व अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्या अध्ययनात व्यत्यय येत आहे. गावातील काही नागरिकांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शासकीय शाळेच्या जागेवर अतिक्रमण करत विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणण्याचा हा प्रकार गंभीर मानला जात आहे. शिक्षण विभाग व स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करुन शाळेची जागा मोकळी करुन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.

गुन्हा दाखल करण्यास विलंब का…?

गणेगाव दुमाला येथील म्हसोबावाडी शाळेच्या जागेत अतिक्रमण करणे किंवा मैदानात ट्रॅक्टरच्या साह्याने काकऱ्या घालणे या प्रकाराला जवळपास दोन ते अडीच महिने उलटून गेले आहेत. याबाबत पालकांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. तरीही प्रशासनाकडुन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात होते. परंतु पालक आणि विद्यार्थ्यांनी शिरुर तहसिलदार कार्यालयात ठिय्या मांडल्यानंतर तसेच सामाजिक कार्यकर्ते योगेश ओव्हाळ आणि काही पत्रकारांनी याचा पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि त्यानंतर संबंधित चार जणांविरोधात शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

त्यामुळे शाळेच्या मुलांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का…? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.या प्रकरणी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री चार जणांविरुद्ध गुन्हा झाला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

7 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

7 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

7 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

7 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

7 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

7 तास ago