पुणे: पुण्यात हॉटेलला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. पुण्यातील दत्तवाडी भागातील प्रसिद्ध आशा हॉटेलमध्ये आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. स्थानिक आणि ग्राहकांना हादरवून सोडणाऱ्या या घटनेत हॉटेलमधील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग गॅस लिकेज किंवा शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. सकाळी साधारण ८ वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या स्वयंपाकघरातून धुराचे लोट बाहेर येताना दिसताच परिसरात एकच गोंधळ उडाला. लगेचच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाची तीन वाहने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
सुदैवाने, वेळेत आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, स्वयंपाकघर आणि त्यातील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची चौकशी सुरू असून अग्निशमन दल व पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. हॉटेलच्या CCTV फुटेजची तपासणी करून नेमकं कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेनंतर स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…