शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चौकातून बसने प्रवास करणाऱ्या महिलेचे तब्बल सव्वा सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) हे माहेर असलेल्या कांता शिनलकर सध्या ठाणे येथे राहत असून आबेगाव तालुक्यातील लोणी धामणी गावच्या यात्रेसाठी शिनलकर या गावी आलेल्या होत्या. शिक्रापूर येथे माहेरी थांबून २७ जानेवारी रोजी पुन्हा शिक्रापूर पुणे बस ने प्रवास करत असताना शिनलकर यांनी त्यांचे सव्वा 6 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पिशवी मध्ये ठेवलेले होते.
पुणे येथे गेल्यानंतर त्यांच्या पिशवीतील दागिने गायब असल्याचे निदर्शनास आल्याने कांता विलास शिनलकर ५६ रा. बदलापूर ठाणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बापू हडागळे हे करत आहे.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…