क्राईम

सणसवाडीत दारुभट्टीवर शिक्रापूर पोलिसांचा छापा

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील भारत गॅस रोड लगत एका ठिकाणी ओढ्याचे कडेला सुरु असलेल्या गावठी दारु भट्टीवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून गावठी दारु बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करत अनिता अंकुश नानावत या महिलेवर गुन्हे दाखल केले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील भारत गॅस रोड लगत ओढ्याचे कडेला एक महिला गावठी दारु तयार करत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली, त्यांनतर पोलीस हवालदार अमोल दांडगे, पोलीस नाईक विकास पाटील, जयराज देवकर, महिला पोलीस नाईक अपेक्षा टाव्हरे यांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्यांना एक महिला काही रसायन मिश्रित करुन गावठी दारु तयार करताना दिसून आली. मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच महिला काटेरी झुडपातून पळून गेली.

यावेळी पोलिसांनी सदर ठिकाणहून काही गावठी दारु व साहित्य असा सुमारे आठ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असून याबाबत महिला पोलीस नाईक अपेक्षा बाजीराव टाव्हरे रा. शिक्रापूर शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अनिता अंकुश नानावत रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे या महिलेविरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवीकिरण जाधव हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

7 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

7 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

7 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

7 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

7 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

7 तास ago