क्राईम

प्रेम वादातून युवतीची क्रूर हत्या; मृतदेहाचे तुकडे पोत्यात भरले अन शहरात फिरवले

आग्रा: 23 जानेवारी रोजी आग्र्यातील ट्रान्स यमुना परिसरात एक भयंकर घटना घडली, ज्यात एका युवतीची तिच्या प्रियकराने क्रूरतेने हत्या केली. प्रेयसीवर संशय असल्यामुळे आरोपीने चाकूने तिचा गळा चिरला, मृतदेहाचे तुकडे केले आणि ते पोत्यात भरून शहरात फिरवले.

कुटुंबीयांनी मुलगी रात्री घरी न आल्याने शोध सुरु केला. मुलगी सापडत नसल्याने त्यांनी ट्रान्स यमुना पोलिस ठाण्यात बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेऊन तीन टीम तयार केल्या आणि शहरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासली.तपासादरम्यान, 24 जानेवारी रोजी रात्री 1 वाजता पार्वती विहार परिसरात पोते आढळले. पोते उघडल्यावर पोलिसांना धक्का बसला; आत युवतीचा मृतदेह होता, परंतु तिचं डोके गायब होतं.

आरोपी आणि कारण

पोलीस चौकशीत आरोपी विनयने सांगितले की, तो आणि मृत युवती एकाच ऑफिसमध्ये काम करत होते आणि त्यांचे प्रेमसंबंध होते. त्याला संशय होता की युवती दुसऱ्या पुरुषाशीही संबंध ठेवते. 23 जानेवारी रोजी ऑफिसमध्ये वाद झाल्यानंतर विनयने चाकूने तिचा गळा चिरला आणि मृतदेहाचे डोके व पाय कापून पोत्यात भरले. त्यानंतर दुचाकीवर पोते लादून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर यमुना पुलावर फेकले; कापलेले डोके नाल्यात फेकले.

हत्या नंतर विनयने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तसेच युवती हरवली असल्याचे नाटक करण्यासाठी तिच्या कुटुंबासोबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला.आरोपी विनय याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, मृत युवतीचे डोके अजूनही सापडलेले नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago