crime
शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथे किरकोळ वादातून एका युवकासह त्याच्या आईला घरात घुसून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सतीश बबन ढोकले, नितीश बबन ढोकले, दिपाली नितीश ढोकले, सुप्रिया सतीश ढोकले यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
करंदी (ता. शिरुर) येथील महेश ढोकले हा घराशेजारी असताना सतीश ढोकले आणि वायरमन त्यांच्या शेतातून चाललेले होते त्यावेळी महेश याने ठिकाणी वीज कनेक्शन देण्यासाठी माझे हरकत आहे असे सांगितले असता सतीश याने महेशला धमकी दिली. त्यावेळी महेश हा घरी जाऊन घडलेला प्रकार आईला सांगत असताना सतीश हा त्याचा भाऊ, पत्नी तसेच आदींसह महेशच्या घरात आले त्यांनी महेशला शिवीगाळ दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली दरम्यान महेशची आई मध्ये आली असता सर्वांनी महेशच्या आईला देखील शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करुन मोबाईल फोडून टाकला तसेच घर पेटवून देण्याची धमकी दिली.
याबाबत महेश गोरक्ष ढोकले (वय ३१) रा. तळेगाव रोड करंदी (ता. शिरुर) जि. पूणे याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सतीश बबन ढोकले, नितीश बबन ढोकले, दिपाली नितीश ढोकले, सुप्रिया सतीश ढोकले यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आजीनाथ शिंदे हे करत आहे
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…