क्राईम

सणसवाडीत युवकाचा कुऱ्हाडीने मारहाण करून खून

शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात नऊ युवकांवर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे 3 दुचाकीहून आलेल्या 9 जणांच्या टोळक्याने एका युवकाला कुऱ्हाडीने मारहाण केली. या घटनेत गोपाळ महादेव लुडकर (वय २७) या युवकाचा खून झाला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात 9 युवकांवर खूनप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील दोन गटांमध्ये भांडणे चालली होती. यावेळी शेजारून चाललेल्या गोपाळ लुडकर याला दगड लागला, त्यामुळे त्याने घरी फोन करुन त्याचे मामा दिगंबर काळे यांना बोलावून घेतले. त्यामुळे दिगंबर हे त्यांचा भाचा गोपाळ याला घेऊन जात असताना तीन दुचाकी वरुन 9 युवक सदर ठिकाणी आले. त्यातील एका मुलाने आमच्या मुलांना का मारले? असे म्हणून हातातील लोखंडी रॉड व कुऱ्हाडने गोपाळ लुडकर यास मारले. गोपाळ चे मामा दिगंबर काळे यांना देखील पायावर मारहाण केली. मात्र, यावेळी गोपाळ याला जास्त मारहाण झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे.

सदर घटनेत गोपाळ महादेव लुडकर (वय २७, रा. आरंभ प्रॉपर्टीज सणसवाडी, ता. शिरुर, जि. पुणे) याचा मृत्यू झाला आहे. गोपाळचा मामा दिगंबर बापूराव काळे हा जखमी झाला आहे. याबाबत दिगंबर बापूराव काळे (वय २८, रा. आरंभ प्रॉपर्टीज सणसवाडी, ता. शिरुर, जि. पुणे, मूळ रा. परळीजोड ता. परभणी जि. परभणी) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात 9 युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

18 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago