क्राईम

शिक्रापूरच्या सरपंचांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा

सरपंच रमेश गडदे यांच्यावरील हल्ल्याचा सभेतून निषेध

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सरपंच रमेश गडदे यांच्यावर चार दिवसांपूर्वी गावातील काही युवकांनी हल्ला करत मारहाण केली असल्याने गावातील आम्ही शिक्रापूरकर ग्रुपच्या युवकांनी नुकतेच निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करुन त्यांच्यावर कठोर शासन करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन देण्यात आले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सरपंच रमेश बबन गडदे यांच्यावर १९ नोव्हेंबर रोजी गावातील काही युवकांनी हल्ला करत मारहाण केली याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र पोलिसांनी एकाला अटक केली तर चौघे फरार झाले आहेत. घडलेल्या घटनेबाबत गावातील आम्ही शिक्रापूरकर ग्रुपच्या माध्यमातून नुकतेच निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सरपंच रमेश गडदे, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, कृष्णा सासवडे, प्रकाश वाबळे, मोहिनी युवराज मांढरे, शालन राऊत, उषा राऊत, सामाजिक कार्यकर्त्या मंगल सासवडे, माजी उपसरपंच दत्ता गिलबिले, नवनाथ सासवडे, सागर सायकर, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष गोरक्ष सासवडे, रवीशेठ भुजबळ, आरपिआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी श्रीकांत ढमढेरे, अंकुश घारे, राजेंद्र मांढरे, बाळासाहेब चव्हाण, दिलीप कोठावळे, गोरक्ष कुंभार, सतीश सासवडे, गणेश सासवडे, अक्षय मांढरे, तुषार आळंदीकर, शुभम वाघ, स्वप्नील महाजन यांसह आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना यापूर्वी सत्तर वर्षात सरपंचांवर हल्ला होण्याची घटना यापूर्वी कधीच घडलेली नाही, सरपंच हे गावाला अडचणीतून बाहेत काढण्याचे काम करत असतात. परंतु सरपंच यांना अडचण आल्यास गावाने त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे, सरपंच कोणत्या गटाचा आहे हे महत्वाचे नसून सरपंच गावचा आहे. याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे असे बाळासाहेबांची शिवसेना गटाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे यांनी सांगितले. तर यावेळी अनेकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून गावामध्ये अशा पद्धतीची प्रवृत्ती खपवून घेणार नसल्याचा इशारा देखील दिला तसेच गावातील युवकांच्या वतीने शिक्रापूर पोलिसांना आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.

सरपंचावर हल्ला होऊनही दहा सदस्य गायब!

शिक्रापूरच्या इतिहासात प्रथमच सरपंच यांच्यावर हल्ला होत मारहाण झाल्याची घटना घडल्याने गावातील युवकांनी पुढाकार घेत निषेध सभेचे आयोजन केले मात्र यावेळी ग्रामपंचायतच्या सतरा पैकी फक्त सातच सदस्य हजर होते आणि दहा सदस्य गैरहजर असल्याचे दिसून आल्याने अनेक पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

शिक्रापूर पोलीस स्टेशनचा लेखाजोखा मुख्यमंत्र्यांपुढे मांडणार…

शिक्रापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिनाभरात येणार असून त्यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये 2 वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या सर्व बाबींचा लेखाजोखा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढे मांडणार असल्याचे देखील रामभाऊ सासवडे यांनी यावेळी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह कोणता झेंडा घेऊ हाती अशीच अवस्था

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरु असताना चौथ्या टप्प्यात शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान…

6 तास ago

ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेच्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगल्याच शाब्दिक चकमकी रंगल्यात.…

6 तास ago

वाघाळे येथे वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल

कारेगाव (प्रतिनिधी) वाघाळे (ता.शिरुर) येथील एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गावातीलच भगवान दत्ताञय दंडवते यांच्यावर…

8 तास ago

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली पण ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात…

9 तास ago

शिरूर तालुक्यातील दरोड्यादरम्यान महिलेचा खून; आरोपी गजाआड…

शिक्रापूर : जातेगावमध्ये (ता. शिरूर) ज्येष्ठ महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे…

15 तास ago

सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवली, पण शेतकऱ्यांना फायदा नाहीच…

पुणे: केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी हटवली असली तरी, दुसऱ्या बाजूला 550 डॉलर प्रति मेट्रिक…

17 तास ago