शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन मारहाण; दोन जणांवर गुन्हा दाखल

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन चुलते, चुलती व त्यांच्या दोन मुलांना लाकडाने मारहाण केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन येथे चुलतीने तक्रार दाखल केल्याने सोमनाथ रमेश जाधव तसेच मनोज रमेश जाधव (रा. निमोणे, ता. शिरुर, ज. पुणे) या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजश्री भाऊसाहेब जाधव (वय ४८) रा.निमोणे ता. शिरुर, जि.पुणे या त्यांचे पती व दोन मुलांसह शेती करुन आपला उदरनिर्वाह करतात. निमोणे गावात गट नंबर १८८४ मध्ये त्यांचे दीर रमेश बापुराव जाधव आणि रावसाहेब बापूराव जाधव (मयत) यांच्या नावे सामायिक तीन एकर क्षेत्र आहे.त्यापैकी या दोघांनी त्यांचे हिश्यांमध्ये यापुर्वी गोठा बांधलेला आहे. तसेच राजश्री यांच्या पतीच्या हिश्याची एक एकर पडीक आहे. परंतु सदरचे सामायिक क्षेत्र त्यांचे मयत सासरे बापूराव हरिभाऊ जाधव यांच्या नावे आहे. त्यावर फक्त वारस नोंद झालेली आहे.

 

दि ४ मे २०२५ रोजी सायंकाळी ७ ते८ च्या सुमारास निमोने सामायिक गट नंबर असलेल्या तीन एकर सामायिक क्षेत्रांमध्ये राजश्री जाधव यांच्या हिश्याच्या पडीक क्षेत्रामध्ये ऊस तोडणाऱ्यांची टोळी बसलेली असल्याने राजश्री त्या ठिकाणी उसाचे वाढे आणण्यासाठी गेले असताना तिथे त्यांचा पुतण्या सोमनाथ रमेश जाधव हा आला आणि राजश्री यांना शिवीगाळ करु लागला.

 

त्यावेळी राजश्री यांचे भाउसाहेब जाधव आणि मुलगा रोहित हे आले. त्यानंतर सोमनाथ जाधव याने रोहितला चापट मारली. त्यावेळी तेथे त्यांचा दुसरा पुतण्या मनोज रमेश जाधव हा आला. त्यानंतर दोघा पुतण्यानी तेथील लाकूड उचलुन राजश्री यांचे पती भाऊसाहेब यांच्या मांडीवर मारहान केली.

 

तर सोमनाथ जाधव याने हातातील लाकूड राजश्री यांचा मुलगा रोहित यास मारत असताना राजश्री यांनी हात मध्ये घालत अडवले असता त्यांच्या हातात लागून दुखापत झाली. या मारहाणीत राजश्री यांच्या मानेला, हाताला कमरेला तसेच त्यांचा मुलगा मुलगा रोहित यास ओठाला डोक्याला आणि पती भाऊसाहेब यांना मांडीला मार लागला आहे.

 

त्यानंतर राजश्री यांची मुलगी सपना हि भांडणे सोडवविण्यास आली असता तिला सोमनाथ याने हाताने मारहाण केली. तसेच दोघे पुतणे सोमनाथ आणि मनोज यांनी या कुटुंबाला ‘पुन्हा नाद केला तर जीवे मारण्याची धमकी दिली आहे’. त्यामुळे शिरुर पोलिस स्टेशन येथे राजश्री जाधव यांनी फिर्याद दाखल केल्याने सोमनाथ रमेश जाधव तसेच मनोज रमेश जाधव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस हवालदार प्रताप टेंगले हे करत आहेत.

शिरुर; कारभारनीच्या नथीतुन तीर मारणाऱ्या महिला सरपंचाच्या पतीची मेहुण्याच्या नावावर MIDC मध्ये दहशत…?

शिरुर; चार वर्षात फक्त नामधारी ग्रामपंचायतच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्या महाशयांचीचं लुडबुड…?

रांजणगाव MIDC तील विविध कामात माजी महिला सरपंचाच्या पतीची लुडबुड…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

12 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago