क्राईम

शिरुर तालुक्यात किरकोळ वादातुन सासऱ्याची सुनेला काठीने मारहाण; गुन्हा दाखल

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील एका गावात सुन घराच्या ओट्यावर जेवण करत असताना दारु पिऊन आलेल्या सासऱ्याने सुनेला जेवायला मागितले असता. सुनेने माझे जेवण झाल्यावर तुम्हाला जेवायला वाढते असे म्हटल्याने सासऱ्याला राग आल्याने सासऱ्याने सुनेच्या डोक्यात काठी मारत डोके फोडल्याने सुनेने शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असल्याने सासऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुनाट (ता. शिरुर) येथील मंगल बाळु बुलाखे (वय ४५) या घरच्या ओट्यावर जेवण करत असताना त्यांचे सासरे नामदेव यशवंत बुलाखे हे तेथे दारु पिवुन आले आणि सुनेला ‘मला जेवायला वाढ’ असे म्हणाले त्यावेळी मंगल बुलाखे या त्यांना म्हणाल्या की ‘थांबा मी जेवण करत आहे माझे जेवायचे झाले की मी तुम्हाला जेवायला वाढते’.

याच कारणावरुन नामदेव बुलाखे यांनी चिडुन जावुन त्यांच्या सुनेला जोरजोरात शिवीगाळ करत तेथे ओट्यावर पडलेली काठी घेवुन ती सुनेच्या डोक्यात मारल्याने त्यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे मंगल बुलाखे यांनी सासरे नामदेव बुलाखे यांच्याविरुध्द शिरुर पोलिस स्टेशन येथे कायदेशीर तक्रार दाखल केली असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार प्रताप टेंगले हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

8 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago