क्राईम

उल्हासनगरातील भूमाफियांची चौकशी क्राईम ब्रांचकडे

खंडणीचा खोटा गुन्हा बुमरॅंग होणार

मुंबई: उल्हासनगरातील टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीची व हितसंबंधितांविरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आता घोटाळेबाजांवरच बुमरॅंग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

मागील महिन्यांत २८ तारखेला हिललाईन पोलिस स्थानकात १ कोटी रुपयांची खंडणी मागत ५ लाख खंडणी घेतल्याबाबतचा खोटा गुन्हा कोणतेही पुरावे नसतांनाही प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्निल पाटील व शैलेश तिवारी यांच्याविरोधात पोलिसांनी नोंद केला.

अश्या खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल होवू शकतात, याबाबत ॲड. पाटील यांनी लेखीपत्राद्वारे अगोदरच पोलिस विभागाला कळविले होते. तरीही, पोलिसांनी कसलीही खातरजमा न करता अधिकारांचा गैरवापर करत घोटाळेबाजांशी संगनमत करत गुन्हा दाखल केला. त्याविरोधात पीडित सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट पोलिस आयुक्त कार्यालयावरच धडक देत बेमुदत उपोषणाचा मार्ग पत्करला. उल्हासनगर महानगरपालिकेतील नगररचनाकार ललित खोब्रागडे यांचा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ॲड. पाटील यांनी केला.

३ जाने २०२५ रोजी पोलिस आयुक्त , ठाणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू झाल्याचं कळताच माजी राज्यमंत्री तथा मा. आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आंदोलकांची भेट घेऊन प्रकरण जाणून घेतलं व पोलिस आयुक्तांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली.

त्या अनुषंगाने मा. पोलिस आयुक्तांनी सदर तपास स्वतःच्या निरीक्षणात क्राईम ब्रांचकडे सखोल चौकशीकरीता सुपूर्द करत असल्याचे आदेश देत संबंधीत दोषी अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.

या चौकशीतून उल्हासनगरातील टीडीआर घोटाळ्याची पाळंमुळंही खणली जाण्याची शक्यता असून सामाजिक कार्यकर्त्यांना खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न घोटाळेबाजांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अलिकडच्या काळात भ्रष्टाचार, घोटाळ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्ते तसंच नागरिकांना कायद्याचा धाक दाखवण्याचे प्रकार वाढले असून त्या विरोधात समाजात असंतोष आहे. त्यामुळेच की काय, या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते व वकील सामील झाले होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

1 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

1 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

1 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

1 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

7 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

8 तास ago