मुख्य बातम्या

शासकीय कामात अडथळा, शिरूरमध्ये पाणीपुरवठा कर्मचार्‍यावर हल्ला

आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर (अरूणुकमार मोटे): शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या शासकीय पाणीपुरवठा योजनेसाठी चारी खोदण्याचे काम सुरू असताना एका इसमाने सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करत कामात अडथळा आणल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकुश माणिक कु-हाडे (वय ४१ वर्ष ) व्यवसाय – पाणीपुरवठा, ग्रामपंचायत शिरूर ग्रामीण हे दिनांक २ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता रामलिंग रोड, श्रीनिवास सोसायटी, शिरूर येथे जेसीबीच्या सहाय्याने चारी खोदण्याचे शासकीय काम करत होते. यावेळी आरोपी अमित जयंत डोंगरे (रा. श्रीनिवास सोसायटी, रामलिंग रोड, शिरूर) याने आपल्या घरासमोरील पाईपचे काम का झाले नाही, या कारणावरून आक्षेप घेत कामात अडथळा निर्माण केला.

आरोपीने फिर्यादी अंकुश कु-हाडे यांच्या कंबरेवर आणि मानेवर दगड मारून जखमी केले. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या जेसीबी सुपरवायझर नाथा सुदाम शिंदे (रा. देवदैठण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनाही मारहाण केली. याशिवाय आरोपीने सुपरवायझरला सोसायटीतील प्रत्येक घरासमोर उठाबशा काढण्यास भाग पाडले. त्यामुळे शिरूर ग्रामपंचायतीकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. यावेळी आरोपीने मोटारसायकल (क्रमांक MH-12-CZ-9623) वर दगड मारून नुकसान केले आणि सरकारी काम थांबवण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

14 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

14 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

14 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

18 तास ago