क्राईम

शिरुर तालुक्यात भोंदूगीरीतून महिलेकडे शरीर सुखाची मागणी

तळेगाव ढमढेरेत खळबळजनक प्रकार

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे भोंदुगिरी करत पूजा पाठ करुन वेगवेगळे आजार बरे करतो असे भासवून दुखणे बरे करण्यासाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा खळबळजनक प्रकार घडल्याने आदिनाथ विश्वनाथ कांबळे या व्यक्तीवर गुन्हे द्काहाल करण्यात आले.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका महिलेला आजारी असल्याने रुग्णालयांतील फरक पडत नसल्याने गावातील आदिनाथ कांबळे हा इसम देवाचे पूजापाठ करुन आजार घालवत असल्याचे समजल्याने महिलेने कांबळे यांची भेट घेतल्याने कांबळे यांनी देवाची पूजा केली. मात्र महिलेच्या आजारावर काहीही फरक न पडल्याने महिलेले कांबळे यांच्याकडे जाणे बंद केल्याने कांबळे महिलेला फोन करुन मी बरे करतो, असे म्हणून महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे बोलू लागला. मात्र त्यांनतर महिलेला जास्त त्रास होऊ लागल्याने महिनेने कांबळे यास फोन करुन तुम्ही पूजा केली का मला जास्त त्रास होतोय, असे म्हटले असता कांबळे याने महिलेशी अश्लील बोलत तुला पूर्ण बरे करतो, असे सांगत शरीरसुखाची मागणी केली.

घडलेल्या घटनेबाबत सदर महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी भोंदूगिरी करणाऱ्या आदिनाथ विश्वनाथ कांबळे रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर)  जि. पुणे या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

10 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

10 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

10 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

14 तास ago