क्राईम

वढू बुद्रुक मध्ये घरगुती वादातून कुटुंबियांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे पती पत्नीच्या घरगुती वादातून पतीसह त्याच्या कुटुंबियांना बेदम मारहाण करुन जखमी करत युवकाचा काटा काढण्याची धमकी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विशाल अनंता एरंडे, महेंद्र घुले, विशाखा गुंडाळ यांसह चार युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील अनाजीचा मळा येथील अमित गुंडाळ व विशाखा गुंडाळ या दोघांमध्ये १८ जानेवारी रोजी किरकोळ वाद झाले होते. त्यानंतर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर आरडाओरडा केल्याचा आवाज आल्याने महेश गुंडाळ घराबाहेर आले. त्यावेळी विशाखा गुंडाळ हि तिच्या भावासह काही युवकांना घेऊन महेशचा भाऊ व विशाखाचा पती असलेल्या अमित गुंडाळ याला मारहाण करत होती.

यावेळी महेश व त्याचे आई वडील भांडणे सोडवण्यास गेले असता मारहाण करणाऱ्या सर्वांनी महेश सह त्याचे आई वडील, आजी आजोबांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली यामध्ये महेश गुंडाळ जखमी झाला आहे, तर यावेळी मारहाण करणाऱ्या युवकांनी अमित गुंडाळ यास रविवार पर्यंत तुझा काटा काढणार अशी धमकी दिली.

याबाबत महेश हरीश्चंद्र गुंडाळ (वय २८) रा. वढू बुद्रुक अनाजीचा मळा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विशाल अनंता एरंडे, महेंद्र घुले, विशाखा गुंडाळ यांसह चार अनोळखी युवक सर्व रा. थुगाव भावडी ता. आंबेगाव जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

9 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

15 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

15 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

16 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

16 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

16 तास ago