क्राईम

व्यावसायिकावर गोळीबार करणारे उज्जैन येथून जेरबंद…

शिरूर: शिरसवडी (ता. हवेली) येथे जमीन व्यावसायिक संतोष गावडे यांची गाडी तिघांनी आपली गाडी बंद पडल्याचं दाखवत मदत मागण्याच्या बहाण्याने अडवली. यानंतर गोळीबार करून २२ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या तिघा कुख्यात दरोडेखोरांना पुणे पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले आहे. मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने उज्जैन येथून या तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ३ गावठी पिस्तूलं आणि लुटलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत.

लोणीकंद पोलीस आणि गुन्हे शाखेने तातडीने तपास चक्र फिरवून आरोपींचा छडा लावला. आरोपी चोरीच्या दुचाकीवरून पळाले होते. पोलिसांना ई-चलन प्रणालीवरून आरोपीचा स्पष्ट फोटो मिळाला. आरोपी बकोरी परिसरात राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीचे आधार कार्ड मिळवले, तर त्याच्या पत्नीने एका ठिकाणी केलेल्या UPI पेमेंटवरून आरोपीचा मोबाईल क्रमांक हाती लागला.

आरोपी कॅब आणि ट्रॅव्हल्सने मध्य प्रदेशात पळाले होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुणे पोलिसांनी थेट उज्जैन गाठून त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत ‘यूपी-एसटीएफ’वर गोळीबार करणारा आणि एन्काउंटरचा आदेश असलेला कुख्यात गुन्हेगार अविनाश त्रिपाठी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मुख्य आरोपी अविनाश श्रीकृष्णचंद्र त्रिपाठी याच्यावर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि नेपाळमध्ये खून, दरोडा, शस्त्र कायदा यांसारखे १३ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफ (STF) पथकावर गोळीबार केला होता, ज्यामुळे त्याच्या एन्काउंटरचे आदेश निघाले होते. तो २०१४ पासून लखनौ पोलिसांच्या ताब्यातून फरार होता. अविनाश त्रिपाठीसोबत महंमद वसीम शोएब आणि सुरेंद्र रामचंद्र पाल यांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुक्यात गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या योगेश मचाले टोळीवर ‘मोक्का’…

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला काही तासांतच परजिल्ह्यातून केले जेरबंद…

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

14 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

15 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

22 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago