क्राईम

चिमुरडीवर पित्याकडून अमानुष अत्याचार; आरोपी फरार, परिसरात संताप

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरातील तिसगाव खवड्या डोंगर वसाहतीत माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ७ ते ९ वर्षे वयोगटातील चिमुरडीवर तिच्याच सावत्र पित्याने अमानुष अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

आरडाओरडीमुळे प्रकार उघड

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास संबंधित मुलगी घरातून जोरात आरडाओरड करत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. संशय आल्याने नागरिकांनी तत्काळ घराकडे धाव घेतली. त्यावेळी मुलीची अवस्था पाहून सर्वजण हादरले. मुलीच्या पाठीवर, हातांवर आणि पायांवर चटक्यांचे ८ ते १० व्रण आढळून आले. हा छळ गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

आईच्या भूमिकेवरही संशय

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतले आणि वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवले. दरम्यान, काही शेजाऱ्यांनी मुलीच्या आईवरही गंभीर आरोप केले असून, सावत्र पित्याच्या कृत्यात तिचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा दावा केला आहे. पोलिसांकडून या आरोपांचीही चौकशी सुरू आहे.

गुन्हा दाखल; आरोपीचा शोध सुरू

या प्रकरणी वाळूज पोलीस ठाणे येथे सावत्र पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, त्याच्या अटकेसाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून, पीडित मुलीला तातडीने वैद्यकीय मदत व समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांच्या डि बी पथकाची धडाकेबाज कामगिरी; दोन म्हशी, दोन बैल आणि पिकअप वाहन असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत पशुधन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिरुर पोलिसांच्या…

3 तास ago

शिरुर शहरात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांचा दणका; २५७ केसेस, तब्बल ३ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

शिरुर (तेजस फडके): वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करणे हि प्रत्येक चालकाची जबाबदारी असते. मात्र…

3 तास ago

सावधान, ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, या आजारांचा धोका

पूर्वीच्या काळी लोक अशी कामं करत असत ज्यात शरीराला जास्त मेहनत करावी लागत असे. पण…

11 तास ago

घसा सारखा खवखवतो, सतत घशात इन्फेक्शन? ५ उपाय, आजारी झोपून राहाव लागणार नाही

घसा खराब होणे, सोलवटल्यासारखे वाटणे आणि खाताना त्रास होणे हे अनेकदा बदलत्या हवामानामुळे, गरम-थंड पदार्थ…

12 तास ago

हृदयविकार काही घरगुती उपाय

आहार: सकाळचा नाश्ता: फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचे…

12 तास ago

‘लेबल खोटं बोललं तरी ग्राहकाला किंमत मोजावी लागते’; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना सज्जड इशारा

मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (FDA) धडाकेबाज कारवाईमुळे राज्यातील भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

12 तास ago