क्राईम

माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर तरुणीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल

मुंबई: अहिल्यानगर शहराचे माजी महापौर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

नोकरीच्या आमिषाने बोलावून अत्याचाराचा आरोप

फिर्यादी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अभिषेक कळमकर यांनी तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अहिल्यानगर शहरात तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे एका लॉजवर बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

व्हिडिओ कॉलवरूनही छळ

तक्रारीनुसार, आरोपी वेळोवेळी मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून तरुणीला कपडे काढण्यास भाग पाडत असे आणि तिला तासनतास मानसिक त्रास देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सततच्या छळाला कंटाळून अखेर संबंधित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली.

व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप

अत्याचार करताना आरोपीने व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांकडे पुरावे सादर

पीडित तरुणीने काही व्हिडिओ स्वरूपातील पुरावे पोलिसांकडे सादर केल्याची माहिती आहे. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, शहराचे माजी महापौर आणि राजकीय पदाधिकारी असलेल्या व्यक्तीवर गंभीर आरोप झाल्यामुळे अहिल्यानगरमध्ये मोठी चर्चा रंगली असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

10 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

10 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

12 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

14 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

14 तास ago