क्राईम

शिक्रापूर पोलिसांना गुंगारा देणारा माजी उपसरपंच जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे मित्राची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर शिरुर तालुक्यातील वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी हा शिक्रापूर पोलिसांना तब्बल सहा महिने गुंगारा देत होता मात्र शिक्रापूर पोलिसांनी माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी यास अटक केली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील बाळासाहेब लांडे यांचा मित्र असलेला वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन माळी याने काही दिवसांपूर्वी लांडे यांच्या घरी येऊन काही कामानिमित्त बाळासाहेब लांडे यांची एम एच १२ एच के ६६७७ की स्कोर्पिओ कार नेली होती, त्यांनतर अनेक दिवस उलटून देखील सचिन माळी हा स्कोर्पिओ घेऊन आला नाही. त्यानंतर सचिन माळी हा वारंवार उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले.

बाळासाहेब राजाराम लांडे (वय ४१) रा. लांडेवस्ती तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता शिक्रापूर पोलिसांनी वाडा पुनर्वसन गावचा माजी उपसरपंच चंद्रशेखर उर्फ सचिन सीताराम माळी रा. वाडा पुनर्वसन (ता. शिरुर) जि. पुणे याचे विरुद्ध मे २०२२ मध्ये गुन्हे दाखल केले होते. मात्र गुन्हे दाखल झाल्यापासून माळी हा पोलिसांना गुंगारा देत होता अखेर काल सायंकाळच्या सुमारास सचिन माळी हा कोरेगाव भीमा परिसरात येणार असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली.

त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर, पोलीस शिपाई भास्कर बुधवंत यांनी सदर ठिकाणी जात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चंद्रशेखर उर्फ सचिन माळी यास अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर व पोलीस शिपाई भास्कर बुधवंत हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

18 सेकंद ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

8 मिनिटे ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

11 मिनिटे ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

14 मिनिटे ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

19 मिनिटे ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

24 मिनिटे ago