महाराष्ट्र

राजवडी हॉस्पिटल येथे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची पाहणी

मुंबई: घाटकोपर येथील राजवडी हॉस्पिटल ची मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांनी (दि. २१ फेब्रुवारी २०२६) दुपारी पाहणी करून रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, स्वच्छता आणि औषध पुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.

महापौरांनी महिला वैद्यकीय रुग्ण कक्ष, प्रसूती कक्ष, प्रसूतीपूर्व कक्ष, पुरुष वैद्यकीय कक्ष, पुरुष शल्यचिकित्सा कक्ष तसेच बालरोग विभागाला भेट देत रुग्णांशी थेट संवाद साधला. रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करावी लागत असल्याच्या तक्रारींची दखल घेत त्यांनी औषध पुरवठा व वितरण तसेच लसीकरणाच्या नोंदवहीची तपासणी केली. दैनंदिन व नियमित लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

दुर्धर आजारांसाठी आवश्यक इंजेक्शनचा पुरवठा का होत नाही, याची माहिती महापौरांनी घेतली. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्याचे निर्देश अधिष्ठातांना देण्यात आले.

दरम्यान, रुग्णालयाच्या पुनर्विकासाचे काम सुरू असले तरी पहिल्या टप्प्यातील काम संथ गतीने सुरू असल्याची बाब नागरिकांनी निदर्शनास आणून दिली. यावर महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या. रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने बांधकामाचा परिसर पूर्णपणे आच्छादित ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

तसेच थाळी पद्धतीने दिल्या जाणाऱ्या अन्नपुरवठ्याचा दर्जा उत्तम राखण्याच्या सूचना देण्यात आल्या. सुरक्षिततेच्या दृष्टीने जुन्या वायरिंगऐवजी नवीन वायरिंग बसवणे, तसेच रुग्णालयात रंगरंगोटी करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.या पाहणीवेळी स्थानिक नगरसेवक धर्मेश गिरी, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक (माध्यमिक आरोग्य सेवा) डॉ. पवार आणि वैद्यकीय अधीक्षिका डॉ. भारती राजूलवाला उपस्थित होत्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भीमाशंकरहून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावात; आढळरावांच्या घरी अचानक भेट

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

धनुष्यबाणावरून सुप्रीम कोर्टात मोठा ट्विस्ट; शिंदे गटाकडून ठाकरे गटाला घेरणारी कागदपत्रे सादर

मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…

10 तास ago

राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर संपन्न; संघटन विस्ताराचा दिला मंत्र

नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…

10 तास ago

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

12 तास ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

14 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

14 तास ago