अहमदनगर: एक सराईत गुन्हेगार वेषांतर करुन पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र पोलिसांनी विशेष ऑपरेशन राबवून या गुन्हेगारास जेरबंद केले आहे. त्याच्याकडून एकूण २ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून दिपक सुरेश गायकवाड (रा.भिंगान) असे या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, श्रीगोंदा पोलिसांकडून विविध गुन्हेगारांचा शोध घेण्याची विशेष मोहीम सुरु आहे. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना भिंगान खालसा येथील दिपक गायकवाड हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने विविध गुन्हे करत असून त्याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मात्र तो सुमारे 3 वर्षांपासून वेषांतर करुन पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फिरत असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान तालुक्यातील शेडगाव परिसरात गायकवाड हा संशयितरित्या फिरत असल्याचे पोलिसांना समजले त्यानुसार या ठिकाणी कारवाई करत त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आतापर्यंत बनावट नंबर टाकून ८ दुचाक्या विकल्याची पोलिसांना कबुली दिली. त्या ताब्यात घेत त्याच्या जवळील रोख रक्कम असा सुमारे २ लाख ६९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…