क्राईम

नोकरीसाठी मुंबईला येण्यास निघालेल्या तरुणाचा गुटखाच ठरला मृत्यूच कारण…

ललितपूर: गुटखा खाणं शरीरासाठी हानीकारक असतं. पण एका तरुणाला गुटखा थुंकताना जीव गमवावा लागला आहे. १९ वर्षीय तरुणाला गुटखा थुंकणं जीवावर बेतलं. ट्रेनमधून गुटखा थुंकताना त्याचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशच्या ललितपूर रेल्वे स्थानकाजवळ वसीमचा मृ्त्यू झाला. तो महाराजगंज परिसराचा रहिवासी होता. भाऊ आणि काही ग्रामस्थांसोबत तो मुंबईत कामासाठी जात होता. मुंबईत जाऊन चार पैसे कमावून कुटुंबाला आधार देण्याच्या हेतूनं त्यानं घर सोडलं. पण तो मुंबईला पोहोचू शकला नाही. ललितपूर रेल्वे स्थानकाजवळ त्याचा अपघात झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्याचा जीव वाचू शकला नाही.

१९ वर्षीय वसीमनं गुटखा थुंकण्यासाठी ट्रेनमधून त्याचं डोकं बाहेर काढलं. ट्रेनचा वेग जास्त होता. वसीमचं डोकं रेल्वे लाईनच्या खांबाला आदळलं. मुंबई सीएसएमटी जात असलेल्या अंत्योदय एक्स्प्रेसमधून तो प्रवास करत होता. जनरल बोगीमधून प्रवास करत असलेल्या वसीमनं गुटखा थुंकण्यासाठी गेटवर गेला. त्यानं डोकं बाहेर काढलं आणि त्याचवेळी अपघात झाला.

वसीमनं डोकं बाहेर काढताच त्याचं डोकं रेल्वे लाईनच्या खांबाला आपटल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. वसीम ट्रेनमधून खाली पडणार होता. पण सहप्रवाश्ांनी त्याला वाचवलं. मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. प्रवाशांनी तातडीनं ट्रेनमधील साखळी ओढली. यानंतर ट्रेन जवळच्या रेल्वे स्थानकात थांबली.

धौर्या रेल्वे स्थानकात रुग्णवाहिका न मिळाल्यानं स्टेशन मास्तरांनी त्याला ललितपूर रेल्वे स्थानकात पाठवलं. ललितपूरमध्ये आरपीएफच्या जवानांनी ललितपूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत त्याचा श्वास थांबला होता. त्यानं जगाचा निरोप घेतला होता. नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला आणि गाव गाठलं.

दोन वर्षांपूर्वी अशीच एक घटना मथुरा भागात घडली होती. हाथरस जंक्शनमध्ये २० वर्षीय बॉबी कुटुंबासह दिल्ली बाडमेर एक्स्प्रेसनं मथुरेला जात होता. तो गुटखा खात होता. रेल्वे फाटकाजवळ त्यानं गुटखा थुंकण्यासाठी डोकं बाहेर काढलं. त्याचं डोकं खांब्याला आदळलं. ट्रेनमधून पडून त्याचा मृत्यू झाला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

14 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

15 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

15 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

15 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

15 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

15 तास ago