महाराष्ट्र

सरपंच, उपसरपंचांच मानधन झाले दुप्पट

नाशिक: राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर योजना आणि निर्णयांचा धडाका लावला होता.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंच, उपसरपंचांना दिले जाणारे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वीसुद्धा सरपंचांच्या मानधनात वाढ केली होती. परंतु ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनात गेली अनेक वर्षांपासून वाढ झालेली नसून त्यांची केवळ 200 रुपये बैठक भत्त्यावर बोळवण केली जात आहे. शासन सरपंच, उपसरपंचांवर मेहरबान, मग आमच्यावरच अवकृपा का? असा सवाल ग्रामपंचायत सदस्यांकडून उपस्थित केला जात आहे.

सरपंच व उपसरपंच यांच्याप्रमाणेच गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत सदस्यदेखील कामकाज करत असतात. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना सन्मानपूर्वक मानधन मिळायला पाहिजे. यासाठी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. परंतु त्याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना केवळ २०० रुपये बैठक भत्त्यावर समाधान मानावे लागत आहे. शासनाने सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट केले, त्याला कोणत्याही सदस्यांनी विरोध न करता या निर्णयाचे स्वागतच केले. परंतु शासनाने ग्रामपंचायत सदस्यांचा विचार करून मानधनात वाढ करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.

ग्रामपंचायतींतील सदस्यांवर अन्याय…

एका ग्रामपंचायतीमध्ये ७, ९, ११, १३ किंवा १७ असे ग्रामपंचायत सदस्य असतात. राज्यात एकूण २७,९५१ ग्रामपंचायती आहेत, मात्र शासनाने याचा विचार न करता केवळ सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ केली. हा ग्रामपंचायतींमधील सदस्यांवरील अन्याय नाही का, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला आहे.

गंगाधर निखाडे, दिंडोरी तालुकाध्यक्ष, सरपंच परिषदशासनाने सरपंच व उपसरपंच यांच्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांचा विचार करून त्यांचीही मानधन वाढ करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत. गावागाडा चालविताना सर्वच सदस्य काम करतात, त्यांनाही मानधन मिळायला हवे,मनोज निकम, ग्रामपंचायत सदस्यग्रामपंचायत सदस्यांना किमान तीन हजार रुपये मानधन देण्यात यावे. राज्य सरकार गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्यांसोबत भेदभाव करीत आहे. गावचा विकास साधताना सर्वच सदस्य काम करतात.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

16 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago